Tarun Bharat

‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यामुळे अग्निहोत्री यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे 11 जवान तैनात असणार आहेत. अग्निहोत्री यांना संपूर्ण भारतभरात ही सुरक्षा पुरवली जाणार आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित असून, यात काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट पाहून अनेकजण भावुक झाले. एकीकडून या चित्रपटाला पाठिंबा मिळत असला तरी दुसरीकडे या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. सोशल मीडियावरून अग्निहोत्री यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असणारा वाद लक्षात घेत अग्निहोत्री यांना केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.

Related Stories

भारतातील रस्त्यांवर धावणार विंटेज कार

Patil_p

नक्षलवाद्यांच्या IED स्फोटात जवान जखमी

datta jadhav

सेनेकडून आमदारांना व्हीप जारी, शिंदे गट साळवींना मतदान करणार?

Archana Banage

येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार ; GPS यंत्रणा बसविणार : नितीन गडकरी

Tousif Mujawar

दिल्लीत दिवसभरात 444 नव्या कोरोना रुग्णांची नोंद 

Tousif Mujawar

चारधाम यात्रेकरूंची संख्या प्रथमच 50 लाखांच्या पुढे

Patil_p