Tarun Bharat

द. गोव्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली

प्रतिनिधी /मडगाव

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांची बदली नवी दिल्लीत करण्यात आली आहे. या संबंधीचा आदेश नवी दिल्लीहून काल बुधवारी गोव्यात आला. जुलै 2020 साली त्यांची गोव्यात बदली झाली होती. कोणताही मोठा गुन्हा घडला की सांघीकपणे काम करुन त्या गुन्ह्याचा तपास लावण्याचे तंत्र त्यांनी राबविले होते आणि म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीत दक्षिण गोव्यातील बहुतेक सर्व मोठय़ा गुन्ह्यांचा तपास लागला होता. नवी दिल्लीत त्यांची बदली युवा व्यवहार खात्यात करण्यात आलेली असून तेथे ते  उपसचिव या नात्याने काम पाहणार आहेत.

Related Stories

गळय़ातील सोनसाखळय़ा खेचणाऱया दोघांना अटक

Amit Kulkarni

‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’च्या अंतर्गत सर्वांगीण विकास साधणार

Patil_p

कोरोना : 645 बाधित, 28 बळी

Amit Kulkarni

आपचे 10 उमेदवार जाहीर

Amit Kulkarni

म्हापशातील व्यापाऱ्यांची आमदारांकडे धाव

Amit Kulkarni

‘पोटाचे विकार आणि उपचार’ उद्या पणजीत वैद्यकीय शिबीर

Amit Kulkarni