Tarun Bharat

‘द ग्रेट इंडियन मर्डर’चा ट्रेलर प्रदर्शित

डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार स्ट्रीम

अजय देवगण अभिनयासह ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर देखील सक्रीय आहे. निर्माता म्हणून त्याने एक नवी सीरिज द ग्रेड इंडियन मर्डर सादर केली आहे. हॉटस्टार स्पेशल्सच्या अंतर्गत निर्मित ही सीरिज माजी भारतीय विदेश अधिकारी विकास स्वरुप यांची पॉलिटिकल थ्रिलर कादंबरी सिक्स सस्पेक्ट्सचे स्क्रीन अडेप्टेशन आहे. विकास स्वरुप यांची कादंबरी क्यू अँड ए पर स्लमडॉग मिलिनियर यासारखी ऑक्सर विजेता चित्रपट तयार करण्यात आला होता.

या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सोहळय़ात प्रतीक गांधी, रिचा चड्ढा, आशुतोष राणा आणि शशांक अरोडा यांच्यासह दिग्दर्शक तिग्मांशू धूलियात सामील झाले. सीरिजमध्ये रघुवीर यादव, शारिब हाशमी, एमे वाघ, जतिन गोस्वामी आणि पाओली दाम देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येणार आहे. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टालवर 4 फेब्रुवारी रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळी आणि बंगाली भाषेत स्ट्रीम होणार आहे.

तिग्मांशूचा हॉटस्टारसोबत हा तिसरा प्रोजेक्ट आहे. या कहाणीत रहस्य, हत्या आणि नशीबाचे उत्तम मिश्रण आहे. सीरिजच्या प्रत्येक व्यक्तिरेखेचे एक वैशिष्टय़ आहे. द ग्रेड इंडियन मर्डर प्रेक्षकांना पसंत पडेल अशी अपेक्षा असल्याचे तिग्मांशू यांनी म्हटले आहे.

Related Stories

वारकऱयांसाठी आगळेवेगळे विठ्ठल दर्शन

Patil_p

टीकू वेड्स शेरुचा फर्स्ट लुक सादर

Patil_p

कर्करोगाशी झुंजणाऱ्या सोनालीचा प्रवास

Archana Banage

ज्युनियर एनटीआरच्या नव्या चित्रपटात आलिया

Patil_p

सुशांतसिंह राजपूतचा ‘छिछोरे’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट

Patil_p

नागार्जुनच्या ‘द घोस्ट’मध्ये सोनल चौहान

Patil_p