Tarun Bharat

‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर प्रदर्शित

4 जून रोजी ओटीटीवर येणार वेब सीरिज

अभिनेता मनोज वाजपेयीची बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’चा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आला आहे. या ऍक्श-ड्रामा सीरिजचा ट्रेलर चाहत्यांना पसंत पडला असूने त जोरदार कौतुकही करत आहेत.

वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी आणि दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा अक्किनेनी दोघेही ऍक्शन अवतारात दिसून येत आहेत. मनोज या सीरिजमध्ये श्रीकांत तिवारी ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर सामंथा सीरिजमध्ये एक महिला दहशतवादी राजीची महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

सुमारे 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर निर्मात्यांनी ही सीरिज 4 जून रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्माता-दिग्दर्शक निदिमोरु आणि कृष्णा डी.के. यांच्या या शोमध्ये मनोज आणि सामंथासह सीमा विश्वास, सनी हिंदुजा, दर्शन कुमार, श्रेया धन्वंतरी, मिमे गुप्ता, प्रियमणि, शारिब हाशमी आणि एन. अलगमपेरुमलही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Related Stories

चित्रपट निर्माते हरीश शहा यांचे निधन

Tousif Mujawar

‘सिक्स सस्पेक्ट्स’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

Patil_p

मोहनलालचा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सुपरहिट

Patil_p

आषाढी एकादशीनिमित्त सावनीचे ऑनलाईन कॉन्सर्ट

Patil_p

‘तारक मेहता..’मधील ‘या’ अभिनेत्यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

‘श्री’च्या चित्रिकरणात अलाया सामील

Patil_p