Tarun Bharat

‘द लंचबॉक्स’ चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन

मुंबई \ ऑनलाईन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन झालं आहे. सोमवर ७ जून रोजी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सहर यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्यांना काही दिवसांपूर्वीच लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान कार्डिएक अरेस्टने त्यांचं निधन झालं. सहर यांच्या निधनानंतर बॉलिवूडच्या कलाकारांसह दिग्दर्शकांनीही दुःख व्यक्त केलं आहे.

सहर अली लतीफ यांच्या निधनावर राजकुमार राव, हुमा कुरैशी, अनुराग कश्यप, शिबानी दांडेकर, रोहित सराफ, मिताली पालकर, निमरत कौर, हर्षवर्धन कपूर, सान्या मल्होत्रा, नोरा फतेही, मसाबा गुप्ता, मानवी गागरू आणि मुकेश छाब्रा, स्वरा भास्कर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

‘शकुंतला देवी’, ‘दुर्गामती’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं. ‘ईट प्रे लव्ह’, ‘झिरो डार्क थर्टी’, ‘मॅकमाफिया’, ‘सेन्स8’, ‘फ्युरियस ७’ आणि ‘हंड्रेड फूट जर्नी’ या चित्रपटांसाठीही त्यांनी काम केलं होतं.

Related Stories

यंदा 1 जूनला केरळात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता

Archana Banage

बगदादमध्ये फुटबॉल स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट, १० जणांचा मृत्यू

Archana Banage

गुजरात निवडणुक : इसुदान गढवी आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

Abhijeet Khandekar

गौतम गंभीरला एका आठवड्यात तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी

Archana Banage

आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

अल्लू अर्जुनचे सरप्राइज

Patil_p