Tarun Bharat

धक्कादायकः तब्बल 38 बळी

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरातील प्रत्येक पेठ आता हॉटस्पॉट बनू लागली आहे. दररोज कोणाचा ना कोणाचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. नव्याने बाधित होणाऱयाचे शहरात प्रमाण वाढते आहे. अगदी शहरत महाविस्फोट सुरु असला तरीही विनाकारण बाहेर फिरणाऱयांची संख्या मोठी आहे. तब्बल 38 जणांचा मृत्यू झाल्यामुळे कैलास स्मशानभूमीवर ताण आला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मनमाड पॅटर्नची पहिली अंमलबजावणी सातारा जिह्यात पाटण तालुक्यात करण्यात आली. एका दिवसांत तब्बल 1543 जणांचा अहवाल बाधित म्हणून आल्याने सातारा शहराबरोबरच जिह्यातील तेरा मोठय़ा गावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. बावधन गावातील कोरोनाची साखळी अजूनही तुटत नाही.

कोरोनाचा अक्षरशः जिह्यात कहर सुरु आहे. बाधितांचा आकडा हा वाढता वाढत चालला आहे. बाधित आढळून आलेल्यांमध्ये तरुणांसह वयोवृध्दाचा समावेश आहे. नवनवे रेकॉर्ड जिह्यात होत आहेत. काल रात्रीच्या अहवालात कोरोना बाधितांचा आकडा हा 1543 वर गेला आहे. जिह्यातील 13 गावांमध्ये कोरोनाचा विस्फोट सुरु आहे. सातारा शहरातील प्रत्येक पेठांमध्ये बाधित आढळून येत आहेत. हे बाधित आढळून येण्याचे प्रमाण हे कधी अधिक प्रमाणात असले तरीही धोकादायक अशी परिस्थिती बनली आहे. तरीही शहरातील नागरिक हे बिनधास्तपणे बाहेर फिरताना दिसत आहे. पोलीस दलातर्फे वारंवार कारवाई केली जात असली तरीही नागरिक फिरत आहेत. त्यामुळे कडक कारवाईची गरज आहे.

38 बाधितांचा मृत्युमध्ये कराड तालुका अव्वल

कोरोनामुळे शुक्रवारी दिवसभरात 38 जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये 27 जण हे 60 ते 80 या वयोगटाच्या वरचे होते. तर 30 ते 45 या वयोगटातील 2 जणांचा समावेश होता. 3 जण हे 45 ते 60 या वयोगटातील होते. तसेच तालुकानिहाय पहाता वाई तालुक्यात 5, सातारा तालुक्यात 7, खटाव तालुक्यात 5, फलटण तालुक्यात 2, कोरेगाव ताल्क्यात 3, माण तालुक्यात 2, कराड तालुक्यात 8, खंडाळा तालुका 1,पाटण तालुका 2 महाबळेश्वर तालुका 2 पुणे 1 असे मृत्यू झाले आहेत.

Related Stories

मुख्यमंत्री, मंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत

datta jadhav

स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकयांचे बिघडले आर्थिक गणीत

Patil_p

तिजोरीतील खडखडाटाने पालिकेत बचतीचे धोरण

Amit Kulkarni

सातारा पालिकेतील भ्रष्ट ‘कचरा’ बाहेर टाकण्याची हीच वेळ

datta jadhav

ऑनलाईन लॉटरी केंद्रावर शाहुपुरी पोलिसांचा छापा

Patil_p

वसंतगडच्या डेंगरावर दोन बिबटय़ांचे दर्शन

Patil_p