Tarun Bharat

धक्कादायक ! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनाबाधित

वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयात उपचार घेणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना अयोध्येत 5 ऑगस्टला होणाऱया राममंदिर भूमिपूजन सोहळय़ाला मुकावे लागणार आहे.

“कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यानंतर मी कोरोना चाचणी करून घेतली. आत्ताच वैद्यकीय विभागाकडून अहवाल प्राप्त झाला असून तो ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. माझी तब्येत ठीक आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी’’ असे अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

गेल्या काही दिवसात अमित शहा हे प्रशासकीय पातळीवर विविध बैठका, आरोग्य अधिकाऱयांना रुग्णालयांना दिलेल्या भेटी-गाठी, दिल्ली शहरातील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यात व्यग्र होते. या काळात त्यांच्यावरील ताण बराच वाढला होता. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सहकार्याने संसर्ग रोखण्यासाठी ‘योद्धय़ा’प्रमाणे बैठकांचा सपाटा लावला होता. आता त्यांचा अहवालच पॉझिटिव्ह आल्यामुळे अलिकडच्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी, पदाधिकाऱयांसह निकटवर्तीयांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

तामिळनाडूच्या राज्यपालांनाही कोरोना

चेन्नाई : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारिलाल पुरोहित यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यांच्यातील संसर्ग सौम्य असल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. ते आता पुढील काही दिवस आपल्या निवासस्थानात राहूनच उपचार घेणार आहेत. अलीकडेच राजभवनमधील तीन कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर राज्यपाल पुरोहित यांनी खासगी रुग्णालयातून आपली कोरोना चाचणी करून घेतली असता त्यांच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनीच स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्षही पॉझिटिव्ह

लखनौ : उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. त्यांनी रविवारी स्वतः हिंदीतून ट्विट करत आपल्याला कोरोना झाल्याची माहिती सार्वत्रिक केली. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

Related Stories

काँग्रेस अन् तेजप्रतापांकडे तेजस्वींची पुन्हा डोळेझाक

Patil_p

दिल्ली विधानसभा निवणुकीची घोषणा

Patil_p

141 दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रीय

Patil_p

शपथविधी होताच राजीनाम्याची मागणी

Patil_p

SBI चा पुढाकार; 30 कोटी खर्च करुन उभारणार कोविड रुग्णालये

datta jadhav

आठवडय़ात सोने 2,500; चांदी 10 हजारांनी स्वस्त

Patil_p
error: Content is protected !!