Tarun Bharat

धक्कादायक : पुण्यात महिला डॉक्टरच्या बाथरूममध्ये छुपे कॅमेरे; एमडी डॉक्टरला अटक

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 


भारती विद्यापीठातील स्टाफ क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या घरात छुपे कॅमेरे शहरातील एका एमडी डॉक्टरने लावले असल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी त्या एमडी डॉक्टरवर गुन्हा दाखल करून, त्यास अटक केली आहे. आरोपी डॉक्टर हा भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात लेक्चर घेण्यासाठी देखील जात होता.


मिळालेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये अज्ञाताने छुपे कॅमेरे लावल्याची धक्कादायक घटना सहा जुलैला उघडकीस आली होती. त्या प्रकरणी महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांकडून आरोपीला शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. यामध्ये आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. सुजित आबाजीराव जगताप (वय 42) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांचा हिराबाग येथे मोठा दवाखाना आहे.


फिर्यादी महिला डॉक्टर भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहेत. त्या सहा जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास कामाला गेल्या आणि सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घरी परतल्या. तेव्हा फ्रेश होण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या. त्यांनी बल्ब लावला तो लागला नाही. त्यानंतर बेडरूममधील बल्ब देखील लागला नाही. त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलावून बल्ब दाखवला, तेव्हा इलेक्ट्रिशियनने त्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

Related Stories

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

Archana Banage

‘या’ फोटोत राधिका दिसते कुणाल पंड्यासारखी

Archana Banage

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

Tousif Mujawar

प्रसिद्ध गायक एस. पी बालसुब्रमण्यम यांचे निधन

Patil_p

‘एक हात मदतीचा, वसा माणुसकीचा’ उपक्रमाला प्रारंभ

Tousif Mujawar

अजित पवार यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

Archana Banage
error: Content is protected !!