Tarun Bharat

धक्कादायक : रत्नागिरी डेपोतील चालकाची आत्महत्या

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरी डेपोतील एका चालकाचा मृतदेह त्याच्या राहत्या भाड्याच्या घरात आज दुपारी आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चालकांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज एसटी प्रशासन कडून वर्तविण्यात आले असून आत्महत्येचे कारण स्पष्ट नसले तरी तीन महिने पगार नसल्याने संबंधित चालकाने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा एसटी कर्मचारी यांच्यामध्ये सुरू आहे.
संबंधित चालकाचे साधारणपणे वय 30 असून नांदेड प्रवासी ड्युटी करून पहाटे तो रत्नागिरीत आला होता.

त्यांनतर तो सध्या राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत होता. मात्र दुपारी दुसरा सहकारी खोलीवर गेला असता दरवाजा न उघडल्याने हा प्रकार समोर आला आहे. संबंधित चालक हा मूळचा बीड येथील असल्याचे माहिती समोर आली आहे.3 महिने पगार नसल्याने सद्या सर्वच कर्मचारी तणावाखाली आहेत. दिवाळी आली तरी अद्यापही पगार झाले नाहीत.

Related Stories

६० लाखांची रोकड लूटप्रकरण : मुख्य सूत्रधारासह अन्य दोन साथीदार अखेर गजाआड

Archana Banage

नोकरभरती रद्द, चालू कामं बंद, नव्या कामांना परवानगी नाही, अर्थ खात्याचे मोठे निर्णय

Archana Banage

कोरोनाच्या आपत्तीतही रत्नागिरीतून 6 एसटी कर्मचारी मुंबईकरांच्या सेवेत!

Patil_p

अवरादी येथे साडेतीन किलो गांजा जप्त

Patil_p

जिह्यात ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार चिंतेत

Patil_p

सांडेलावगण-कासारी येथे खाडीत दोघे जण बुडाले

Patil_p