Tarun Bharat

धक्कादायक : राज्यात आतापर्यंत 714 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण

मुंबई / प्रतिनिधी

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पोलीस कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. राज्यातील आत्तापर्यंत तब्बल 714 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीसही अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र हेच पोलीस कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. राज्यातील आत्तापर्यंत तब्बल 714 पोलीसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पैकी 61 जण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत तर 5 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. राज्यात 689 पोलीस सक्रिय कोरोना रुग्ण आहे.

पोलिसांवर हल्ले

कोरोना विषाणूबरोबर दोन हात करण्यासाठी डाॅक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार यांच्या बरोबर पोलिस कर्मचारी देखील मेहनत घेत आहेत. मात्र पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे, याचबरोबर पोलिसांवरील हल्ल्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. संचारबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. आतापर्यंत 194 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. या प्रकरणी 689 हल्लेखोर नागरिकांना अटक करण्यात आली आहे. एका होमगार्डसह 73 पोलीस कर्मचारी हल्ल्यात जखमी झाले आहेत.

एक लाख गुन्हे दाखल

लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यभरात 1,00,245 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 19297 नागरिकांना अटक झाली आहे. याशिवाय 54611 वाहने जप्त करण्यात आली आहेत. लॉकडाऊन कालावधीत 1289 अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून 3 कोटी 76 लाख 53 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे

Related Stories

‘या’ मंत्र्याच्या मुलाने पॅरिसच्या आयफेल टॉवरवर एका मुलीला केला प्रपोज

Archana Banage

इन्सुली येथे महिला दिन साजरा

Anuja Kudatarkar

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास आता ATS करणार; उच्च न्यायालयाचा आदेश

Abhijeet Khandekar

वंदनगडावर शिववंदनेश्वर प्रतिष्ठानने केले शिवकार्य

Patil_p

बाधितांना नेणाऱया पथकावर दगडफेक

Patil_p

मंगळवारी तब्बल 56 एसटी दाखल!

Patil_p