तरुण भारत न्यूज
मनोरंजन क्षेत्रात आणखी एका आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येतून अद्याप कित्येक जण सावरले नाहीत तोपर्यंत आणखी एका अभिनेत्याने आयुष्य संपवले आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रीवास्तव चंद्रशेखर याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृदेहावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीवास्तव चंद्रशेखर हा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार, चंद्रशेखरने 4 फेब्रुवारी, 2021 ला आत्महत्या केली. त्याच्या वडीलांच्या घरात त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. हे घर व्यावयसायिक कारणासाठी वापरले जात होते. अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, चंद्रशेखर गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होता.
दरम्यान, श्रीवास्तवने प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता धनुषसोबत चित्रपटात काम केले आहे. २०१९ मध्ये एनई नोकी पायुम थोट्टामध्ये तो धनुषसोबत सहकलाकार म्हणून दिसला होता. तसेच तो वल्लमई थारायो या वेबसीरिजमध्येही त्याने काम केले आहे.


previous post