Tarun Bharat

धडा व्यक्तिमत्व विकासाचा

Advertisements

प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष आहे. प्रत्येकाच्यात एक वेगळी खासियत आहे, जिच्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. हा वेगळेपणाच ठरवतो की आपण कोण आहोत, कसे आहोत आणि एखाद्या परिस्थितीत आपण कसे वागतो. बहुतेकवेळा ज्या विशेषतांमुळे आपले नुकसान होते, त्यांच्या प्रती आपण जागृत असतो, संवेदनशील असतो. मग त्यांच्यामुळे आपल्यात न्यूनगंड येतो. पण आपण हे जाणतो की येथे प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय आहे, बस…! गरज आहे, ती आपली अंतर्गत क्षमता जागवण्याची आणि व्यक्तिमत्व सुधारण्याची. इथेच व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रिया मदत करणे सुरु करतात.

व्यक्तिमत्त्व विकासामुळे आळस आणि अनुत्साह आणि निरसतेमध्ये अडकलेली व्यक्ती कार्यक्षम, उत्साही, प्रसन्न आणि आपल्या ध्येयाने प्रेरीत व्यक्ती बनते. व्यक्तिमत्त्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती आपल्या वैशिष्टय़ांना कोणत्याही प्रतिकाराशिवाय आणि आपल्या सीमांच्या बंधनांना त्यागणे शिकते, आनंदी राहणे शिकते आणि हे सर्व अधिक उत्साहाने आणि चैतन्याने करते.

व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकास होत असतो. या विकासातून तिचा पिंड घडत असतो. व्यक्तीचा हा घडलेला पिंड म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्टय़पूर्ण समायोजन होत असते, त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक, मानसिक यंत्रणेची संघटना होय.

जीवन जगत असताना विविध बाह्य घटकांचा, प्रामुख्याने सामाजिक घटकांचा, व्यक्तीविकासावर परिणाम होत असतो. जैविक बीजे आणि बाह्य घटक यांच्यातील आंतरक्रियेचा परिपाक म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. अर्थात व्यक्तिमत्त्व विकासात आनुवंशिकता आणि वातावरण या दोन्हीशी संबंधित घटकांचा वाटा असतो.

व्यक्तिमत्त्वाची सुधारणा

व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालील सूचना लक्षात ठेवणे व त्यावर अंमल करणे उपयुक्त ठरेल. व्यायाम आणि नियमित सकस आहार घेऊन व्यक्तीला आपले शरीर निकोप व पीळदार बनविता येते. काळा रंग व बसके नाक असूनही पिळदारापणाची इतरांवर छाप पडणारच.

आपण कोणतेही काम करीत असताना आपणांवर सोपविलेले काम व्यवस्थित केल्यास आपणावर दुसरी व्यक्ती रागावणार नाही. विनाकारण कोणी रागावत असेल तर आपण ती गोष्ट खपून घेता नये. अशा व्यक्तीला तेव्हाच ती गोष्ट निदर्शनास आणून देणे आवश्यक असते. म्हणजे कालांतराने त्या व्यक्तिला स्वतःची चूक कळेल. आपले स्वतःचे चुकले असेल तर आपण आपली चूक कबूल केली पाहिजे व पुन्हा ती घडणार नाही याचा विचार आपण अगत्याने केला पाहिजे. काहीजण स्वतः काम न करता उपदेश देत राहतात, अशा व्यक्तीचे कोणी ऐकत नाही. म्हणून स्वतः आदर्श काम करून मग दुसऱयांना सांगावे.

आपण आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी अनेक थोर व्यक्तींचे जीवन चरित्र वाचत राहिले पाहिजे. थोर व्यक्तींनी आपले जीवन कसे घडविले, त्यांनी कोणकोणते कार्य केले आहे. आपले स्वतःचे जीवनमान कसे उंचावले आहे, यावरून आपण आपलेसुद्धा व्यक्तिमत्व सुधारू शकतो. व्यक्तिने आपल्या गुणदोषांची योग्य दखल घेऊन त्यात इष्ट असे बदल करण्याचा सतत प्रयत्न केला तर व्यक्तिमत्त्वाची सुधारणा बऱयाच प्रमाणात होऊ शकते.

Related Stories

कचऱयाचा पुनर्वापर

Patil_p

मनोरंजनाचा ‘धुरळा’

Patil_p

क्रोध हा खेदकारी

Patil_p

सामाजिक कार्याचा स्मरणसोहळा

Patil_p

तत्त्वे व्यवस्थापनाची

Patil_p

मका लागवड लाभदायक

Patil_p
error: Content is protected !!