Tarun Bharat

धनंजय फाळकर यांना आज श्रद्धांजली

पणजी / प्रतिनिधी

गोमंतकीय रंगभूमीचे सेवक आणि सुपुत्र प्रसिद्ध प्रकाशयोजनाकार कै.धनंजय फाळकर यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण गोमंतकीय रंगभूमीला धक्का बसला आहे. धनंजय फाळकर यांनी अनेक वर्षे रंगभूमीची सेवा केली. त्यांनी असंख्य अशा नाटकांना, एकांकिकांना आपल्या प्रकाश योजना केली होती.धनंजयने प्रकाश योजना केली नाही अशी संस्था व कलाकार गोव्यात विरळच असेल . प्रकाशयोजने बरोबरच त्यांनी दिग्दर्शन व भूमिका पण केल्या होत्या.  ते कला आणि संस्कृती संचालनालयात थिएटर आर्ट शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याप्रमाणे कला अकादमीच्या स्कूल ऑफ ड्रामा चे माजी विद्यार्थी होते. त्यांच्या स्मरणार्थ रुदेश्वर पणजी संस्थेने शुक्रवार दिनांक 1 ऑक्टोबर  रोजी सायंकाळी पाच वाजता कला व संस्कृती भवन, पाटो – पणजी येथे श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे. समस्त गोमंतकीय कलाकार व स्नेही मंडळींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

केशकर्तनालय सुरु केल्यास गुन्हा दाखल करणार

Patil_p

सांगली जिल्ह्यात 27 हजार 590 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण – जिल्हाधिकारी

Archana Banage

दोन महिन्यात अंबानीची संपत्ती 28 टक्क्मयांनी घटली

Patil_p

विट्यात आमदार गोपीचंद पडळकर यांची नगरपालिकेसाठी चाचपणी

Archana Banage

जिल्हा न्यायालयानजीक भीषण अपघात; कोल्हापूरचे 2 युवक ठार

datta jadhav

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

Abhijeet Khandekar