Tarun Bharat

धनंजय मुंडेंनी ताईसाहेब..म्हणताच पंकजा मुंडे म्हणतात, हक्क तुम्हाला आहेच भाऊ !

मुंबई \ ऑनलाईन टीम

धनंजय मुंडे यांनीही सलग सहा ट्वीट करत पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडेवर टीका केली होती. या टीकेला पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. राज्याच्या भल्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीन. त्याची दखलही घेतली जाईल. पण तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बंधूरायाला लगवला आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, राज्याच्या भल्यासाठी PM, जिल्ह्याच्या CM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल! तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!


बीडमधील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. यावरुन पंकजा मुंडे आणि सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांच्यात ट्वीटरवॉर रंगले आहे.

रेमडेसिवीरचा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडलाही पुरेसे लस मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले होते. या ट्वीटवरुन त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यांच्या या ट्वीटल सलग सहा ट्वीट करत धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले होते. त्यांनी म्हटले होते की, ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! त्यांच्या याच ट्वीटल पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले आहे.

Related Stories

२०२३ च्या निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत येईल : अरुण सिंह

Archana Banage

मे महिन्यात कोरोनाने जिह्याचे कंबरडे मोडले

Patil_p

तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड

datta jadhav

दिल्लीत ऑक्सिजनअभावी आणखी 20 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav

हरियाणा : डोंगर कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत 25 जण दबल्याची शक्यता

Abhijeet Khandekar

…ही तिसऱ्या लाटेची धोक्याची सूचना : अजित पवार

Tousif Mujawar