Tarun Bharat

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; गाडीत पिस्तुल ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल

परळी/प्रतिनिधी

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून करुणा शर्माच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण करुणा शर्मा यांनी पोलिसांनीच गाडीत पिस्तूल ठवल्याचा आरोप केला आहे. आता करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल ठेवतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओतील व्यक्ती कोण असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.

Related Stories

जुगार खेळताना माजी आमदारासह 29 जणांना अटक

datta jadhav

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 1251 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

महाराष्ट्रात 14,348 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

सातारा : 14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

Archana Banage

सोलापूर शहरात तब्बल 91 नवे कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

हज यात्रेच्या फॉर्ममधील इन्कम टॅक्स रिटर्नची अट रद्द करा : जहांगीर हजरत

Archana Banage