Tarun Bharat

धनगरवाडा अडवलपाल येथील लोकांची रस्त्यासाठी शोकांतिका

Advertisements

अतीवृष्टी झाल्यास रस्त्यावरून वाहते पाणी : पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे लोकांना धोका

प्रतिनिधी /डिचोली

  गोवा मुक्तीची 60 वर्षे साजरी करीत असताना राज्य सरकारतर्फे विकासाची उंच उंच उड्डाणे भरली जात असताना डिचोली मतदारसंघातील अडवलपाल पंचायत क्षेत्रात येणाऱया धनगरवाडा येथील लोकांची पावसाळय़ात रस्त्यामुळे शोकांतिकाच सुरू आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर अडवलपाल गावातील धनगरवाडय़ाला जोडणाऱया रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी भरून ते वेगाने वाहत असल्याने या वाडय़ावरील लोकांचा गावाशी व बाहेरील जगाशीच जणू संपर्क तुटतो. अशा परिस्थितीत काही आपत्कालीन घटना घडल्यास या वाडय़ावरील लोकांनी काय करावे ? असा प्रश्न या वाडय़ावरील लोकांसमोर उभा ठाकतो.

   साधनसुविधा विकासाच्या बाबतीत सदैव लक्षवेधी प्रकल्प साकारण्यात अग्रेसर असलेल्या गोवा राज्य सरकारला मुक्तीनंतर 60 वर्षे होऊनही या वाडय़ावरील लोकांना दिलासा देता आलेला नाही, हि सुध्दा एक मोठी शोकांतिकाच आहे. या धनगरवाडय़ावर सुमारे 50 घरे असून लोकसंख्या दोनशेच्या वर आहे. वाडय़ावरील लोकांना आपल्या दैनंदिन कामांसाठी अडवलपाल, अस्नोडा किंवा डिचोलीत जावे लागल्यास या रस्त्याचाच आधार.आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला सरकारकडून अजूनही साधा पाजरही फुटलेला नाही. दर पावसात येथ असलेला ओहळाला नदीचे स्वरूप प्राप्त होते. आणि लोकांचा वाडय़ातून बाहेर पडण्याचा एकमेव दुवा पाण्याखाली जातो. या वाडय़ावरून बाहेर पडण्यास भटवाडी नानोडा येथूनही एक अडगळीचा मार्ग आहे. पण अतिवृष्टी झाल्यानंतर सदरही रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी भरते आणि तोही धोकादायकच बनतो. त्यामुळे एका बेटावर असल्यागत पाणी ओसरण्याची लोकांना वाट पहावी लागते.

 चार वेळा नारळ फोडला परंतु पुलाचा पत्ताच नाही ?

या वाडय़ावरील लोकांची पावसाळय़ातील समस्या व गैरसोय दूर व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीं?नी (आमदार) चार वेळा या पुलाच्या पायाभरणीचा नारळ फोडला. मात्र अद्यापही त्याजागी पुल साकारला गेलेला नाही. या वाडय़ावरील लोकांचे हित जपण्यात स्थानिक आमदार फोल ठरले असून या लोकांचा केवळ मतांसाठी वापर केला जात आहे. निवडणुका जवळ आल्या कि त्यांना पुलाचे आश्वासन द्यायचे, नारळ फोडण्याची नाटके करायची, हेच प्रकार आतापर्यंत चालूच आहेत, असा आरोप यावेळी डिचोली काँग्रेस गट अध्यक्ष मेघश्याम राऊत यांनी केला आहे.

आणीबाणीच्या वेळी बाका प्रसंग उभा राहण्याची भिती.

  या वाडय़ावर दोनशेहून अधिक लोकांचे वास्तव आहे. त्यात जे÷ नागरिक, महिला, मुले यांचा समावेश आहे. सध्या कोवीड महामारी सुरू आहे. या वाडय़ावरील महिला गरोदरही आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या वाडय़ावरून लोकांना बाहेर पडणे दुरापास्त झालेले आहे. दुचाकी चालकांना आपली दुचाकी एका काठावर ठेऊन पाण्यातून वाट काढत वाडय़ावर जावे लागते. हि कसरत करतानाच अचानक मोठय़ा पावसामुळे पाण्याचा वेग वाढल्यास एखादा माणूस वाहूनही जाण्यची शक्मयता आहे. तसेच वाडय़ावर जर एखादा आणिबाणीचा प्रसंग निर्माण झाला आणि कोणालाही इस्पितळात नेण्याची पाळी आली तर काय करायचे. पाण्याचा वेगवान प्रवाह पाहता 108 रूग्णवाहिका किंवा इतर वाहनही पाणी पखर करण्याचे धाडस करणार नाही. अशावेळी या भागातील लोकांसमोर धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. असे मेघश्याम राऊत यांनी म्हटले.

या परिस्थितीला राज्य जलस्रोत खाते जबाबदार

  या संपूर्ण परिस्थितीला राज्य सरकारचे जलस्रोत खाते जबाबदार असल्याचा आरोप मेघश्याम राऊत यांनी केला. तिळारी धरणातील पाणी गोव्यात आलेल्या कालव्यांमधून सोडले जाते. आणि सदर कालव्यांच्या गेटस् खुल्या ठेऊन ते पाणी थेट नदी ओहोळात सोडले जाते. त्यामुळे पावसाळय़ात या भागातील ओहळ व नद्यांना क्षमतेपेक्षा जास्त पाणी असते. तिळारी धरण पावसाळय़ापूर्वी खाली करून ते पावसाळय़ात बंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी कालव्यांमधून सोडण्याची पाळी येणार नाही. धनगरवाडा अडवलपाल येथील या ओहोळाला याच कालव्यांमधील मोठय़ा प्रमाणात पाणी येते. त्यात नंतर जोरदार पाऊस पडल्यास त्या पाण्याची पातळी बरीच वाढते आणि प्रवाहाचा वेगही वाढतो. असे मेघश्याम राऊत यांनी सांगितले.

अन्यथा सभापतींच्या घरासमोर उपोषणास बसणार.

  या रस्त्याबाबत सदैव या लोकांची दिशाभूल करून आज समस्येतच ठेवलेल्या सभापती तथा आमदार रजेश पाटणेकर यांनी या रस्त्याच्या आणि पुलाच्या बाबतीत आज (गुरू. दि. 15 जुलै) संध्याकाळपर्यंत ठोस आश्वासन किंवा शब्द द्यावा. अन्यथा सभापतींच्या घरासमोर आपण उपोषणास बसणार, असा इशारा मेघश्याम राऊत यांनी.दिला आहे.

आठ दिवस सुध्दा वाडय़ाचा तुटतो संपर्क

या वाडय़ावरील लोकांसाठी या रस्त्याचा विषय म्हणजे शोकांतिकाच आहे. दरवषी पावसाळय़ात जोरदार पाऊस झाल्यानंतर हा लहानसा पुल व रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जातो. आणि लोकांचे या रस्त्यावरून येणे जाणे पूर्णपणे ठप्प होते. पावसाचा जोर चालूच राहिल्यास आठ दिवस सुध्दा या वाडय़ावरील लोकांना घरीच रहावे लागते. कोणत्याही कामांनिमित्त बाहेर यायला मिळत नाही. आजपर्यंत केलळ.आमची उपेक्षाच झालेली आहे, असे या वाडय़ावरील मुकुंद कोरगावकर यांनी सांगितले.

या पुलाची वर्क ऑर्डर मार्च महिन्यातच देण्यात आली आहे – सभापती पाटणेकर

  धनगरवाडा अडवलपाल येथील लोकांची पावसाळय़ात रस्त्याअभावी होणारी गैरसोय आणि समस्या याबाबत आमदार या नात्याने आपणाला पूर्णपणे जाणीव आहे. त्याच दृष्टीने हि समस्या कायमची निकालात काढण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करून या लहानशा पुलाच्या ठिकाणी तीन मीटर उंच पुलाचा प्रस्ताव सरकार दरबारी मांडला होता. सदर संपूर्ण सोपस्कार पूर्ण होऊन, निविदा निघून गेल्या 31 मार्च 2021 रोजी उमेश परब या कंत्राटदाराला कामाची वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. या पुलाच्या कामासाठी पाईप्स आणि इतरही सामान आणण्यात आले होते. मात्र नेमके याच काळात कोवीडची दुसरी लाट धडकल्याने परिस्थिती भयावह बनली होती. याव्यतिरिक्त जर एप्रिल महिन्यात कामाला हात घातला असता तर पावसाळय़ात पुन्हा मोठी समस्या निर्माण झाली असती. या वाडय़ासाठी पर्यायी रस्ता नसल्याने हा पावसाळा गेल्यानंतर या पुलाचे काम हाती घेण्याचे ठरविण्यात आले. सदर काम 1 कोटी 18 लाख 25 हजार रूपयांचे असून पुलाला तीन मीटर उंची देण्यात येणार आहे. तर रूंदी 8 मीटर असणार. जोडरस्त्यासह 1 किलो मीटरच्या अंतराचे हे काम आहे. असे याबाबत स्पष्टीकरण सभापती राजेश पाटणेकर यांनी दिले आहे. धनगरवाडा अडवलपाल येथील लोकांनी केवळ या पावसाळय़ातच कळ सोसावी, पुढील पावसात या भागातील लोकांची गैरसोय दूर होणार आहे, तसेच या कामाबध्दल कुणालाही काही शंका असल्यास आपण खुल्या चर्चेलाही तयार आहे, असेही सभपती राजेश पाटणेकर यांनी सांगितले.

Related Stories

आमदार विजय सरदेसाई यांचा उद्यापासून पुन्हा ‘संडे डायलॉग्स’

Amit Kulkarni

राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग

Omkar B

काणकोणात मलेरिया, डेंग्यु रोगासंबधी जागृती सुरू

Amit Kulkarni

पत्रादेवी चेकनाक्मयावर पकडली 17 लाखांची दारू

Omkar B

राज्यातील प्रत्येक नागरिकास स्वयंपूर्ण करण्याचे प्रयत्न

Amit Kulkarni

वजन आणि माप खात्याची मोठी कारवाई

Amit Kulkarni
error: Content is protected !!