प्रतिनिधी/आटपाडी
धनगर समाजाचे नेते भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला 10 लाखांची आर्थिक मदत केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधन मंचच्या पदाधिकारी यांच्याकडे झरे येथे हा मदतनिधी सुपूर्द करण्यात आला.
धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून विविध माध्यमातून लढा देत आहे. समाजातील सर्वपक्षीय नेते, विविध संघटना धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी न्यायालयात ही प्रयत्न गरजेचे ठरले आहेत. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील आरक्षण प्रश्नी अनेक लढे दिले आहेत.
धनगर आरक्षण लढ्याच्या न्यायालयीन प्रक्रियेला आणि अन्य कामाला आर्थिक पाठबळ म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे (ता.आटपाडी )येथे 10 लाखांची आर्थिक मदत केली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षण न्यायालयिन लढ्याचे प्रमुख मधू शिंदे यांच्याकडे ही मदत प्रदान करून आरक्षण प्रश्नी सर्व ते योगदान देण्याचे आश्वासन दिले.


previous post