Tarun Bharat

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

Advertisements

बेळगाव : स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती शुक्रवारी बेळगाव परिसरात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. धर्मवीर संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात आले. यावषी कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने जयंती कार्यक्रम करण्यात आला. सकाळी 6 वाजता संभाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. सुनील जाधव व राजू शेट्टी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी शंभूभक्त कै. अर्जुनराव गौंडाडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर संभाजी महाराजांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते. रामलिंगखिंड गल्ली, लोकमान्य टिळक चौक, हेमू कलानी चौक, ताशिलदार गल्ली, छत्रपती शिवाजी उद्यान येथे पालखीची सांगता झाली.

यावेळी शिवप्रेमी गौरांग गेंजी, आदित्य पाटील, श्रीनाथ पवार, कामराज शहापूरकर, साईराज चौगुले, स्वयम् फडतरे, रोहित फडतरे, प्राची चौगुले, मानसी फडतरे, राणी चौगुले, बबिता फडतरे, उमा घाटकर, बाळकृष्ण घाटकर, ज्योतिबा धामणेकर, विनायक शेट्टी यांसह शिव-शंभूप्रेमी उपस्थित होते.

error: Content is protected !!