Tarun Bharat

धर्मवीर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करणाऱयांना नोटिसा

Advertisements

आमदार बेनकेंसह शिवप्रेमींचा समावेश

प्रतिनिधी/ बेळगाव

धर्मवीर संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ध. संभाजी चौकामध्ये कोरोनाचे नियम भंग करून पूजन केले म्हणून शिवभक्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सर्वांना कॅम्प पोलिसांनी बोलावून नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

धर्मवीर संभाजी चौकाचे सुशोभिकरण करून त्या ठिकाणी राज्याभिषेक दिन साजरा केला. सुशोभिकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, आमदार अनिल बेनके, नगरसेवक जयतीर्थ वेंकटेश सौंदत्ती, राजू शेट्टी, सौरव सावंत, प्रसाद मोरे, आदित्य पाटील, श्रीनाथ पवार, निशांत कुडे, ओमकार पुजारी यांच्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केवळ शिवभक्तांना लक्ष्य बनविण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. अनेक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचा भंग होत आहे. मात्र, त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. मात्र, शिवभक्तांवर कर्नाटक संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा कलम 4, 5(1), 5(3), 5(4) अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले. शनिवारी सकाळी 10 वाजता या सर्वांना कॅम्प पोलिसांनी बोलावून घेतले. त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.

Related Stories

निपाणीत जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

उचगाव-कल्लेहोळमध्ये शिवप्रतिमेला दुग्धाभिषेक

Amit Kulkarni

रबर-फोम शीटच्या मखरांनी सजली बाजारपेठ

Amit Kulkarni

पवन धनंजय, श्रीयन, दक्षण एस., मीनाक्षी मेनन विजेते

Amit Kulkarni

हारुगेरी पोलिसांकडून चोरटय़ांना अटक

Amit Kulkarni

महापालिका निवडणूक सुरळीत-शांततेत

Amit Kulkarni
error: Content is protected !!