Tarun Bharat

धर्मसंसदेतील वादग्रस्त वक्तव्यांवर मंत्री नितीन गडकरींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

ऑनलाईन टीम/तरुण भारत

काही दिवसांपूर्वी हरिद्वार आणि रायपूरमध्ये झालेली धर्म संसद चांगलीच चर्चेत राहिली होती. या धर्मसंसदेत झालेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, “आमच्या राजांनी कधीही कोणाची प्रार्थनास्थळे तोडली नाहीत. आम्ही विस्तारवादी नाही. संपूर्ण जगाचे कल्याण झाले पाहिजे, असे आम्ही मानतो. केवळ विश्वाचेच नाही, तर प्राण्यांचेही कल्याण व्हावे, असं आम्ही मानतो, हीच आपली संस्कृती आहे. म्हणूनच हा विचार मुख्य आहे. अशा परिस्थितीत कोणी विरोधात बोलले तर ती आपली मुख्य विचारधारा नाही. ती नाकारली पाहिजे. तो कोणत्याही धर्माचा असो, त्याला महत्त्व देऊ नये,” असं त्यांनी सांगितलं.,” असं ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

Related Stories

लखनौमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटला प्रारंभ

Patil_p

नागरिकत्व कायदा विरोधक दलितविरोधी

Patil_p

भारतीय हद्दीत शिरलेले 10 पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या ताब्यात

Archana Banage

मुलगा झाला या खुशीत वाटले पेढे, पण तो निघाला कोरोनाग्रस्त..

Tousif Mujawar

कुर्डुवाडी नगरपालिकेत नळधारकांची थकबाकी गोठवून २७ लाखाचा अपहार

Abhijeet Khandekar

रेल्वेची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करू : अनिल देशमुख

prashant_c