Tarun Bharat

धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धीतर्फे दिव्यांगांना व्हीलचेअर

बेळगाव : धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना, धर्मस्थळ समुदायतर्फे अनगोळ परिसरातील दिव्यांग व्यक्तींना तसेच वेगवेगळ्य़ा क्षेत्रात उत्तम कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रहदारी विभागाचे एसीपी शरणाप्पा, नगरसेवक श्रीशैल कांबळे, चेतन हणमण्णावर उपस्थित होते.

प्रारंभी वैशाली यांनी स्वागत केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. धर्मस्थळ जिल्हा संचालक प्रदीप यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली. दिव्यांग व्यक्तींना विनामूल्य व्हीलचेअर, आरोग्य संरक्षण अनुदान तसेच गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत यावेळी केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानविकास समन्वय अधिकारी सुरेखा कोळी यांनी केले. किशोर तोरकर यांनी आभार
मानले. 

Related Stories

ट्रकच्या चेस्सी मिळविण्यासाठी मंडळांची दमछाक

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुकमध्ये दौडची उत्साहात सांगता

Amit Kulkarni

मंडोळी-हंगरगा रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

Patil_p

जीआयटी एमबीए विभागातर्फे डब्ल्यूआयई हॅकेथॉन स्पर्धा

Amit Kulkarni

यावर्षी कित्तूर उत्सव दोन दिवस

Amit Kulkarni

पंतप्रधानांची रशिया- युक्रेन युद्धात मध्यस्थी…पण सीमा प्रश्नाकडे दुर्लक्ष

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!