Tarun Bharat

धर्मांतरणाच्या नेटवर्कचा 7 राज्यांमध्ये फैलाव

चौकशीतून नवे खुलासे – नोएडा-केरळमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण – अन्य देशांमध्ये कारवायांची कबुली

वृत्तसंस्था / नोएडा

उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये मूक-बधिरांच्या शाळेत हिंदूंचे धर्मांतर घडवून आणण्यासह दहशतवादीही तयार केले जात होते. धर्मांतराचे हे जाळे उत्तरप्रदेशासह केरळ, आसाम, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूतही फैलावलेले आहे. यासंबंधीचा खुलासा डेफ सोसायटीच्या संचालिका रोमा रोका यांनी एटीएसच्या चौकशीत केला आहे. हिंदू मुलांचे धर्मांतर घडवून आणण्यात या डेफ सोसायटीचा मोठा हात आहे.

धर्मांतर करविणारा आरोपी मौलाना उमर गौतमचा एक नवा व्हिडिओ एटीएसच्या हाती लागला आहे. यात 18 वेळा इंग्लंड आणि 4 वेळा अमेरिकेचा प्रवास केल्याचे सांगताना तो दिसून येतो. विदेशी रॅकेट यात सामील असल्याची माहिती समोर आल्यावर लवकरच याचा तपास एनआयएकडे वर्ग केला जाऊ शकतो.

डेफ सोसायटीचा सहभाग

सामाजिक कक्षेत उपेक्षित वाटणाऱया मुलांचेच धर्मांतर घडवून आणले जात होते. अशा मुलांना दहशतवादाचे प्रशिक्षण देखील दिले जात होते. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हस्तक म्हणून काम करणाऱया मौलानांची संस्था इस्लामिक दावा सेंटर अनेक वर्षांपासून नोएडा डेफ सोसायटीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना लक्ष्य करत होते. शाळेत अनेक मुस्लीम मौलाना आणि दहशतवादी हिंदू असल्याचे दाखवून विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी यायचे आणि त्यांना धर्मांतरासाठी तयार करायचे.

काश्मिरी विद्यार्थ्यांकडून प्रलोभने

काश्मिरी विद्यार्थी धर्मांतरासाठी येथील हिंदू विद्यार्थ्यांना इस्लामिक संघटनांकडून मिळणारी रक्कम आणि अन्य सुविधांची प्रलोभने दाखवत. एखादा विद्यार्थी जाळय़ात अडकल्यास काश्मिरी विद्यार्थी याची माहिती शाळेच्या कर्मचाऱयांना द्यायचे आणि कर्मचारी हा संदेश इस्लामिक दावा सेंटरपर्यंत पोहोचवत होते.क

केरळमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण

धर्मांतर घडवून आणणाऱया विद्यार्थ्यांना आयएसआयकडून रक्कम मिळत होती. हिंदू विद्यार्थ्यांचे धर्मांतर करविल्यावर त्यांना केरळच्या इडुक्की जिल्हय़ात थांगलपारा येथे दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात येत होते. तेथे दहशतवादी संघटना सिमीचे प्रशिक्षण केंद्र आहे. केरळच्या या दहशतवादी केंद्रात धर्मांतर करवून घेत आलेल्या विद्यार्थ्यांना वादग्रस्त साहित्य शिकविले जात होते. तसेच शस्त्रास्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते.

मौलानांची कसून चौकशी

एटीएसने पकडलेल्या दोन्ही मौलानांना 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. दोन्ही आरोपींना रोमासमोर आणून चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर धर्मांतर करविलेल्या ठिकाणी या आरोपींना नेण्यात येईल.

महिन्यात 15 हून अधिक जणांचे धर्मांतर

इस्लामिक दावा सेंटर जामियामध्ये सुमारे 1 हजार लोकांच्या धर्मांतराचे दस्तऐवज प्रदान केल्याचा दावा उमर गौतमने केल्याचे दुसऱया चित्रफितीत आढळून आले आहे. इस्लामिक दावा सेंटरमध्ये महिन्याला सरासरी 15 हून अधिक लोकांना धर्मांतराचे दस्तऐवज देण्यात येते. इंग्लंड, सिंगापूर, पोलंडमध्येही धर्मांतराचे काम केले जात असल्याचे त्याने म्हटले आहे.

धर्मांतर प्रकरणातील घडामोडी…

धर्मांतर प्रकरणाच्या चौकशीत लवकरच एनआयएचा सहभाग

मुख्य आरोपी दिल्लीच्या जामियानगर येथील रहिवासी

विदेशी फंडिंगचे इनपुट्स मिळाल्याने केंद्रीय यंत्रणाही सतर्क

मौलाना उमर गौतम अन् जहांगीर विरोधात एनएसए अंतर्गत कारवाई

Related Stories

सुंदर पिचाई आणि पंतप्रधान मोदी यांची भेट; ‘भारताच्या G20 अध्यक्षपदाला पाठिंबा

Abhijeet Khandekar

गुजरात किनारपट्टीजवळ मालवाहू जहाजांची धडक

Patil_p

उत्तराखंडात 82 नवे कोरोना रुग्ण; 03 मृत्यू

Tousif Mujawar

दिलासा! छत्तीसगडच्या जिंदाल स्टील प्लान्टहून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ दिल्लीत दाखल

Tousif Mujawar

लडाख दौऱ्यावर पोहोचले संरक्षणमंत्री

Patil_p

गुन्हे रद्द झाल्यानंतरच माघार

Patil_p