Tarun Bharat

धाकू मडकईकर यांचा डोंगरी येथे जाहीर सत्कार

प्रतिनिधी / तिसवाडी

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे सेंट लॉरेन्स (आगशी) मतदारसंघाचे सदस्य धाकू मडकईकर यांचा डोंगरी येथील श्री षष्टी शांतादुर्गा पिंपळकट्टा देवस्थान समितीतर्फे ज्येष्ठ नागरिक प्रेमानंद शिरोडकर यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

धाकू मडकईकर यांनी जिल्हा पंचायतीवर सलग तीनवेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे राबविण्यात यश मिळविले आहे. अनेकांना त्यांनी स्वतः पदरमोड करुन मदत केली आहे. सरकारी योजनांचा लाभही त्यांनी अनेकांना मिळवून दिला आहे. त्यांच्या या सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन हा सत्कार करण्यात येत असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक प्रेमानंद शिरोडकर, विजेश वेर्णेकर, महेंद्र शिरोडकर, दशरथ नाईक व्यासपीठावर उपस्थित होते. धाकू मडकईकर यांना शाल, श्रीफळ, पुष्प, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना मडकईकर म्हणाले की सामाजिक कार्ये करण्यात आपल्याला आनंद मिळत आहे. देवाच्या कृपेने हे सारे घडत असून लोकांची आपल्याला चांगली साथ लाभत आहे. अजूनही अनेक कामे राबवायची असून लोकांचे सहकार्य यापुढेही आवश्यक आहे. आजचा सत्कार म्हणजे आपण देवी षष्टी शांतादुर्गेचा प्रसाद मानतो. या सत्कारामुळे आपली सामाजिक बांधिलकीची जबाबदारी वाढली असून ती पूर्ण करण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

बाजारमळ-कुर्टी येथे उघडय़ावर कचरा टाकण्यास विरोध

Patil_p

सशक्त समाजसाठी साहित्य निर्मितीची गरज

Patil_p

स्वराज्य संस्था बळकट होणे आवश्यक : दिगंबर कामत

Amit Kulkarni

प्रत्येक निवडणूक फायनलच अन् प्रत्येक मतदार महत्त्वाचा

Patil_p

मडगाव नगराध्यक्षपदी घनश्याम शिरोडकर

Amit Kulkarni

पालये सार्व. गणेशोत्सव मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन

Amit Kulkarni