Tarun Bharat

धामणे (एस) येथे टस्कराचा धुमाकूळ

भात व ऊस शेतीचे नुकसान

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमेवर असणाऱया धामणे (एस) येथे टस्कराचा धुमाकूळ सुरू आहे. या टस्कराकडून भात व ऊस शेतीचे नुकसान होत आहे. भात व ऊस ही दोन्ही पिके आता ऐन भरात असताना टस्कराकडून नुकसान होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱयांनी केली आहे.

आजरा, चंदगड, गडहिंग्लज व तिलारी धरणाच्या परिसरात दरवषी हत्ती दाखल होतात. या वषीही धामणे (एस), तुडये, तिलारी नगर या परिसरात एक टस्कर दाखल झाला आहे. या टस्कराकडून मोठय़ा प्रमाणात शेतीचे नुकसान करण्यात येत आहे. भात पिकाची कापणी व मळणी सुरू असताना टस्कर दाखल झाल्याने हाता तोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. ऊस तोडणी केली जात असतानाच टस्कराकडून नुकसान होत आहे. यामुळे अस्मानी सुल्तानी संकटांना शेतकरी सामोरे जात आहेत.

शेतकऱयांचे नुकसान होऊनदेखील वन विभागाकडून कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होत असून, वन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱयांनी केली आहे. टस्करामुळे लक्ष्मण पाटील, प्रकाश पाटील, धाकलू पाटील, भरमा गावडे, गोविंद चौकुळकर यांच्यासह इतर शेतकऱयांचे नुकसान झाले आहे.

Related Stories

किरण ठाकुर यांचे 71 व्या वर्षात पदार्पण

Amit Kulkarni

सीआरपीएफच्या त्या जवानाची वैद्यकीय तपासणी

Patil_p

तळघरातील व्यावसायिकांकडून दुप्पट दंड

Amit Kulkarni

दैवज्ञ ब्राह्मण संघातर्फे रौप्यमहोत्सवानिमित्त कार्यक्रम

Amit Kulkarni

भ्रष्टाचाराच्या विळख्यामुळे नंदगड ६ दिवस अंधारात

mithun mane

मनपा विभागीय कार्यालयाची इमारत हटविण्यास प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!