Tarun Bharat

धामणे ग्रा. पं. अध्यक्षपदी योगिता बेन्नाळकरांची निवड

उपाध्यक्षपदी मंजुळा मेलीनमनी : बिनविरोध निवड झाल्यामुळे समाधान

वार्ताहर / धामणे

धामणे ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक 4 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्राम विकास आघाडीतर्फे अध्यक्षपदी योगिता परशराम बेन्नाळकर तर उपाध्यक्षपदी मंजुळा संजीव मेलीनमनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून अर्बन वाटर सप्लायर अधिकारी एस. बी. हालण्णावर यांनी
काम पाहिले.

 धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी मिळून या ग्रामपंचायतमध्ये 19 सदस्य आहेत. त्यापैकी 10 महिला सदस्या व 9 पुरुष सदस्य आहेत. बी.सी.ए. कॅटेगेरी अध्यक्ष व एससी कॅटेगरी उपाध्यक्ष दोन्ही महिला बिनविरोध झाल्या आहेत. या ग्रामपंचायतमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड पहिल्यांदाच बिनविरोध झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

याप्रसंगी पीडीओ वीणा हडपद यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांना पुढील विकास साधण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व विद्यमान ग्रा. पं. सदस्य मारुती बाळू मरगाण्णाचे यांनी ग्राम विकास आघाडीतर्फे सर्वांनी मिळून गावातील समस्या सोडविण्याचे यावेळी आश्वासन दिले.

Related Stories

आयपीएलवर बेटिंग घेताना चौघांना अटक

Patil_p

विमानातून 57 मेट्रिक टन साहित्याची वाहतूक

Omkar B

पूर्वसूचना न देताच रस्ते केले बंद

Amit Kulkarni

माणसांच्या चांगुलपणावरील विश्वासापोटीच यशस्वी

Amit Kulkarni

मराठा स्पोर्ट्स, एसएसएस फौंडेशन, फौजी इलेव्हन संघ विजयी

Amit Kulkarni

मराठीच्या अस्मितेसाठी पुन्हा एकीचा प्रयत्न करा

Omkar B