Tarun Bharat

धामणे बसवाण्णा मंदिर चोरीबाबत नागरिकांची पोलीस निरीक्षकांशी चर्चा

वार्ताहर/ धामणे

धामणे बसवाण्णा मंदिरातील चोरीसंदर्भात येथील देवस्की पंचकमिटी आणि नागरिकांनी वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांची सोमवार दि. 3 रोजी भेट घेऊन चर्चा केली.

27 जानेवारी रोजी धामणे येथील बसवाण्णा मंदिरातील मूर्तीवर घातलेले साडेतीन किलो दागिने मंदिराच्या दरवाजाची कडी तोडून चोरटय़ांनी चोरी केल्याने धामणे, कुरबरहट्टी, मासगोंडहट्टी, देवगणहट्टी येथील नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.

यासंदर्भात दि. 28 जानेवारी रोजी वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नागरिक आणि देवाचे पुजारी रितसर तक्रार नोंदविली होती. परंतु या प्रकरणाला आठवडा झाल्याने सोमवार दि. 3 रोजी देवस्की पंच आणि नागरिकांनी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांची भेट घेऊन मंदिरातील चोरीसंदर्भात लवकरात लवकर चोरांना गजाआड करण्यासाठी विनंती केली. यावेळी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार म्हणाले, आम्ही कसोसीने प्रयत्न करून थोडय़ाच अवधीत त्या चोरटय़ांना गजाआड करू, असे उपस्थितांना आश्वासन दिले. याप्रसंगी देवस्की पंच श्रीकांत डुकरे, महादेव चौगुले, जोतिबा धर्मोजी, विनोद आकणोजी, परशराम रेमाणाचे, अशोक कामशेट्टी, यल्लाप्पा रेमाणाचे, ग्रा. पं. सदस्य विजय बाळेकुंद्री, मोनापा व्हनुले, वसंत बाळेकुंद्री, बाळू केरवाडकर, रामा बाळेकुंद्री, पिंटू मादाकाचे, लक्ष्मण रेमाणाचे, ग्रा. पं. सदस्य महादेव यळवी, मंजुनाथ हणगोंड आदी उपस्थित होते.

Related Stories

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाच्या कामाला मिळणार गती

Patil_p

आता महाराष्ट्राच्या उपराजधानीला विमानसेवा

Amit Kulkarni

अनगोळ-वडगाव गटार बांधकाम सुरू

Amit Kulkarni

Gauri Lankesh Murder Case: न्यायालयात सरकारी वकिलांनी सादर केली साक्षीदारांची यादी

Archana Banage

पीडीओंना चेकपोस्टवर डय़ुटी बजावण्याचा आदेश

Amit Kulkarni

मर्चंट्स सोसायटीतर्फे प्रदीप अष्टेकरांचा सत्कार

Omkar B