Tarun Bharat

धामणे येथे पारायण सोहळय़ाची मुहूर्तमेढ

वार्ताहर /धामणे

धामणे विठ्ठल रखुमाई मंदिर येथे शनिवार दि. 5 ते सोमवार दि. 7 पर्यंत अडीच दिवसाचे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 30 रोजी यल्लाप्पा निलजकर यांच्या हस्ते या पारायण सोहळय़ाच्या मुहूर्तमेढचे पूजन हभप मारुती महाराज सांबरेकर यांच्या सानिध्यात करण्यात आले. याप्रसंगी हभप यल्लाप्पा भोसले, मोनाप्पा व्हनुले, शंकर अकणोजी, यल्लाप्पा काकतकर, बाळू मुतगेकर, रघुनाथ युवाजी, जोतिबा दौलतकर आदी उपस्थित होते.

 पारायण सोहळय़ाची माऊली दिंडी शुक्रवार दि. 4 रोजी दुपारी 4 वाजता निघणार असून या दिंडीचे उद्घाटन उमेश पाटील यांच्या हस्ते तर रात्री मंडप उद्घाटन मयूर चौगुले यांच्या हस्ते होणार आहे. या पारायण सोहळय़ाचे अधि÷ान हभप मारुती महाराज सांबरेकर सांभाळणार आहेत. दि. 5 रोजी पहाटे 4 वाजता पारायण सोहळय़ाला सुरुवात होणार आहे.

  पारायणाचे दैनंदिन कार्यक्रम, पहाटे 4 ते 6 काकडारती, सकाळी 6 ते 8 विविध पूजन, सकाळी 8 ते 8.30 ध्वजवंदन, 8.30 ते 10 ग्रंथवाचन, 10 ते 12 विश्रांती, दुपारी 12 ते 3 महिला भजन, दुपारी 3 ते 5 हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 प्रवचन व रामजप, रात्री 9 ते 11 कीर्तन, 11 पहाटे 4 जागर भजन.

  दि. 5 रोजी रात्री 9 वाजता हभप आनंदराव पाटील महाराज मळगे, जि. कोल्हापूर यांचे कीर्तन, दि. 6 रोजी सायंकाळी 5 ते 7 प्रवचन हभप गंगाराम महाराज यरमाळकर यांचे होणार असून रात्री 9 ते 11 या वेळेत हभप मिलींद महाराज सातारकर (सातारा) यांचे कीर्तन होणार आहे.

 दि. 7 रोजी सकाळी 10 ते 12 हभप लव महाराज यांचे कालाकीर्तन होऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा झाल्यानंतर दुपारी 1 ते 4 महाप्रसादाचे वाटप आणि त्यानंतर पारायणाची सांगता होणार आहे.

Related Stories

खरीप हंगामात पीक विम्याचे संरक्षण

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात सोमवारी 266 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

रस्ते, लाईट, पाणी, गटारी या समस्यांचे तात्काळ निवारण करा

Rohit Salunke

कोणी तरी मला गोव्याला पोहोचवा रे बाबांनो!

Patil_p

एस.जी.बाळेकुंद्री कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

Patil_p

अतिक्रमण हटविण्याची कारवाई ; कर्मचाऱयावर उगारला हात

Patil_p