Tarun Bharat

धामोडपैकी नऊनंबर येथे जनावरांवर पहिल्यादांच ‘लंपी ‘ रोगाचे आक्रमण

धामोड / वार्ताहर

धामोडपैकी नऊनंबर (ता.राधानगरी ) येथे जनावरांच्यावर पहिल्यादांच ‘लंपी ‘ ( त्वचा रोग ) या विषाणूजन्य साथीच्या रोगाने आक्रमण केले आहे. तालुक्यात पहिल्यांदाच हा लंपी रोग आढळून आला आहे. त्यामूळे दूध उत्पादकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

येथील सुरेश गणपती भामटेकर यांच्या गायीच्या शरीरावर गाठी, शरीरावरील ग्रंथीला पायाला, पोळीला सुज आली असून ताप, अशक्तपणा ही लक्षणे दिसत आहेत. याबाबत येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.शिंदे यांनी गायीची पाहणी करून उपचार केले. तालुक्यात जनावरावर हा लंपी आजार पहिल्यांदाच आल्याने पशुपालकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार संसर्गजन्य प्रकारचा आहे.

याबाबत डॉक्टर शिंदे म्हणाले, “सलग सात दिवस बाधीत जनावरांच्यावर उपचार केल्यावर आजार संपुष्टात येतो. मात्र विषाणूजन्य आजार असल्याने इतर जनावरांनाही त्याचा धोका होऊ शकतो. “

Related Stories

वारणा साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक गोविंदराव जाधव यांचे निधन

Archana Banage

विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱयांवर कारवाई करा

Archana Banage

शाहू समाधी स्मारकाच्या पूर्णत्वासाठी सव्वा पाच कोटींची गरज

Archana Banage

शिरोळात मुस्लिम समाज आक्रमक; नुपुर शर्मावर कारवाईची मागणी

Abhijeet Khandekar

देश अन् समाजाशी अतुट नाळ असलेला शास्त्रज्ञ

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्ह्यात दोन, शहरात आठ नवे कोरोना रुग्ण

Archana Banage