Tarun Bharat

धारगळ दोन खांब रस्त्याचे सुशोभीकरण काम निकृष्ट

प्रवीण आर्लेकर यांचा दावा : सरकारने कामाची चौकशी करण्याची मागणी :  जंगल वाढले तसेच कचऱयाचे दर्शन

प्रतिनिधी /पेडणे 

गोव्यात देशी आणि विदेशी पर्यटक यावे, येथील पर्यटन स्थळे त्यांनी पहावी यासाठी केंद्र सरकारकडून शेकडो कोटी रुपये गोवा सरकारच्या पर्यटन खात्याच्या पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आले आहेत. मात्र या पैशातून योग्यप्रकारे काम होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सरकारचा कोटय़वधीचा निधी वाया जात आहे. निकृष्ट दर्जाची कामे आणि अर्धवट कामाची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी पेडणे मतदारसंघाचे मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी केली आहे.

स्वदेश दर्शन योजने अंतर्गत गोवा पर्यटन विकास महामंडळ मार्फत पेडणे तालुक्मयात अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. त्यात नवीन प्रकल्पाचा भरणा किंवा जुन्या प्रकल्पांना चालना दिली जात नाही. तसेच जे प्रकल्प पूर्ण झाले त्यांची निगाच राखली जात नाही. स्वदेश दर्शन योजनेच्या निधीतून आज धारगळ दोन खांब ते आरोबा या मुख्य रस्त्यांच्या बाजूला जंगल आणि कचऱयाचे दर्शन होत आहे. करोडो रुपये पाण्यात घालवणाऱया लोकप्रतिनिधींना जनतेने जाब विचारण्याची गरज आहे. शिवाय बांधकामाची चौकशी सरकारने करून जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवा, अशी मागणी आर्लेकर यांनी यावेळी केली.

धारगळ पंचायत क्षेत्रातील दोन खांब ते आरोबा या मुख्य रस्त्याचे सुशोभीकरण स्वदेश दर्शन योजने अंतर्गत गोवा पर्यटन विकास महामंडळ यांनी सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून केले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे, जी फुटपाथ उभारलेली आहे. त्याला ठिकठिकाणी तडे गेले, सर्वत्र झाडे-झुडपे वाढलेली आहेत. विजेचे खांब आहेत. त्या खांबाखाली रात्रीचा अंधारच असतो. ठिकठिकाणी कचरा फेकला जातो, हा स्वदेश दर्शन प्रकल्प कचऱयाचे दर्शन देतो कि काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

 मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. हा प्रकल्प अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे. जो फुटपाथ तथा वॉकिंग टॅक चालण्यासाठी उभारला आहे.  त्या बाजूला मोठय़ा प्रमाणात झाडे वाढलेली आहे. त्यातून माणसे चालू शकत नाही, शिवाय सर्वत्र कचरा साचलेला आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे या प्रकल्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. कोणीही याची देखरेख केली नाही. आता सरकारने या प्रकल्पाची पूर्ण चौकशी करावी, अशी मागणी प्रवीण आर्लेकर यांनी केली आहे.

Related Stories

विद्यार्थ्याने स्वतःशी स्पर्धा करणे गरजेचे

Amit Kulkarni

केरी सत्तरीत स्वच्छता मोहिमेला स्थानिकाचा आक्षेप

Amit Kulkarni

आयआयटी विरोधकास अटक, तिघांना वॉरंट

Amit Kulkarni

प्रखर हिंदुत्ववादी अवधुत कामत यांचे निधन

Omkar B

केपेतील दुर्गापूजनोत्सव यंदा मर्यादित स्वरूपात

Patil_p

भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांना सुरुवात

Patil_p
error: Content is protected !!