Tarun Bharat

धारगळ येथील ऊस शेती आगीत बेचिराख

Advertisements

धारगळ /वार्ताहर

धारगळ ते मोपा विमानतळ पर्यंत चा जोड रस्ता आता वादग्रस्त बनत चालला आहे. एकूण आठ किलोमीटर लांबी व ऐशी मीटर रुंदीचा  हा रस्ता सरकारने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. या नियोजित महामार्गा मध्ये शेतकरी विविध तर्हेची शेती करीत आहेत , काजू बागायती चे उत्पन्न घेत आहेत. मागच्या महिन्यात या भागात सरकारी अधिकारी सर्वेक्षण करण्यास आले असताना त्यांना संबंधित शेतकऱयांनी पिटाळून लावले होते. आता परत एकदा या आठवडय़ात  या जागेचं फेर सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या अनुषंगाने आज मंगळवारी दुपारी येथील उभ्या असलेल्या ऊस पिकाला कोणीतरी समाज कंटकांनी आग लावली. या आग लावण्या मध्ये त्याच सरकारी कर्मचाऱयांचा हात असल्याचा संशय शेतकऱयांनी व्यक्त केला आहे. आगीची खबर मिळताच गावा मधील सर्व शेतकऱयांनी जळत असलेल्या ऊस शेतीत धाव घेतली. पण पूर्ण वाढलेला उसाने पेट घेतला, हे दृश्य पाहून सर्व शेतकरी रडकुंतीला आले संपूर्ण वर्षाची मेहनत धुळीला मिळाली. आता पुढे काय? असा सवाल ते स्वतःलाच विचारीत आहेत. या आगीमध्ये ज्या शेतकऱयांना जास्त नुकसान झालं आहे त्यात प्रकाश पालयेकर, शिवाजी राऊळ, लक्ष्मण राऊळ भिकाजीं राऊळ रश्मी राऊळ नंदकिशोर पाळये कर, मंगेश बागकर सतीश कानूलकर, पांडुरंग बागकर, झिलू नारोजी, आनंद शिरोडकर प्रेमानंद शिरोडकर रामेश्वर कांबळी दामोदर नाईक मदन नारोजी या शेतकऱयांचा समावेश आहे. सरकारनेच या भागातून तिलारी कालवा नेला आहे, मुबलक प्रमाणात पानी असल्याने शेतकऱयांनी मोटय़ा प्रमाणात उसाची लागवड केली होती व आता सरकारी अधिकाऱयांनीच ही आग लावल्याचा संशय बळावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Related Stories

आझादनगर गणेशोत्सव सर्वधर्मसमभावाचे प्रतीक

Omkar B

वास्कोत भाजपापासून दुरावलेल्यांचा पक्षात पुन्हा प्रवेश, सदानंद शेट तानावडे यांनी केले स्वागत

Amit Kulkarni

रक्षाबंधन कोरोनाच्या सावटाखाली

Omkar B

हिंदू समाज संघटित राहिल्यास गोमंतक सुरक्षित

Amit Kulkarni

बागवाडा मोरजी येथे पायवाटेवरून तणाव

Amit Kulkarni

सत्तरीतील बंधाऱयात मुबलक पाणीसाठा

Amit Kulkarni
error: Content is protected !!