Tarun Bharat

धारवाडमध्ये शेतकऱयांचा ट्रक्टर मोर्चा

केंद्राविरोधात दिल्लीत सुरू असणाऱया आंदोलनाला पाठिंबा

वार्ताहर/ हुबळी

केंद्र सरकारच्या नूतन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देऊन शनिवारी धारवाडमध्ये विविध शेतकरी संघटनांनी ट्रक्टरवरून मोर्चा काढला. धारवाडच्या कला भवनपासून निघालेला टॅक्टर मोर्चा सुभाष रोड, विवेकानंद सर्कल, केसीसी बँक सर्कलमार्गे पुन्हा कला भवन येथे दाखल झाला. आंदोलनावेळी शेतकऱयांनी केंद्र सरकारविरोधात धिक्काराच्या घोषणा दिल्या. शेतकरीविरोधी कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत. शेतकऱयांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील, प्रदेश काँग्रेसचे प्रसारमाध्यम विश्लेषक पी. एच. निरलकेरी, माजी खासदार प्रा. आय. जी. सनदी, गणेश देवी, शंकर हलगत्ती, भीमप्पा कसायी तसेच मोठय़ा संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Related Stories

एक इंचही जमीन देणार नाही!

Omkar B

जीआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांतर्फे विविध प्रकल्पांचे प्रदर्शन

Patil_p

सहा महिन्यात केवळ एक हजार रेशनकार्डे रद्द

Omkar B

‘सुपर-30’मधून विद्यार्थ्यांचा विकास

Omkar B

आमदार निधीतून मंदिर उभारणीसाठी निधी

Amit Kulkarni

वाळू तस्करी विरोधात तक्रार केली म्हणून पोलिसांकडून तरुणाला मारहाण

Tousif Mujawar
error: Content is protected !!