Tarun Bharat

धावत्या रेल्वेतही मिळणार रिक्त जागांची माहिती

Advertisements

तरुण भारत संवाद

विजय थोरात/सोलापूर

रेल्वे प्रवाशांना प्रशासनाकडून येत्या काही दिवसांमध्ये गाडीमधील रिक्त जागा विषयी माहिती धावत्या गाडीतही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवास करणे आणाखी सोयीस्कर झाले आहे. घरबसल्या प्रवाशांना कोणत्या डब्यातील आणि कोणती सीट उपलब्ध आहे. याविषयी ऑनलाइन माहिती मिळण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मोबाईल आणि कॉम्प्युटरवर ही माहिती पाहता येणार आहे.

रेल्वेमध्ये सिटांचे आरक्षण पूर्वीपेक्षा सोपे आणि सोयीस्कर झाले आहे.  आयआरसीटीसीने रेल्वे आरक्षणाचा चार्ट ऑनलाईन बनविला आहे. यामुळे घरबसल्या रेल्वे प्रवाशांना ऑनलाइन चार्ट पाहता येणार आहे. म्हणजेच आता कोणत्या प्रवासात, कोणत्या वर्गात-कोचमध्ये, कोणत्या डब्यात, कोणत्या वर्गात रिक्त सीट आहेत, हे कोणत्याही प्रवाशांना ऑनलाईन पाहता येणार आहे.  आयआरसीटीसीच्या चाटस्-रिक्त पर्यायावर हे पाहिले जाऊ शकते. रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, यामुळे प्रवाशांना चार्ट तयार झाल्यानंतर ट्रेनमध्ये रिक्त जागांची माहिती मिळू शकेल.

चार तास आधी सूचना दिली जाईल. ट्रेन सुटण्यापूर्वी चार तास आधी पहिला चार्ट तयार केल्यानंतर माहिती दिली जाणार आहे. गाडी सुटण्यापूर्वी रेल्वे स्थानकावर 30 मिनिटांपूर्वी दुसरी यादी प्रवाशांना पाहता येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या सांगण्यानुसार सध्याचे आरक्षण आणि पहिल्या चार्टनंतर तिकिटे रद्द करण्याच्या आधारे दुसरा चार्ट तयार केला जाईल. नवीन वैशिष्टय़ आयआरसीटीसी ई-तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्मच्या वेब आणि मोबाईल दोन्ही ठिकाणी आवृत्त्यांवर उपलब्ध असणार आहे. रेल्वेचे म्हणणे आहे की, सीट उपलब्धतेच्या माहितीच्या आधारे प्रवासी तिकिट बुकिंगसाठी टीटीईशी संपर्क साधू शकतील. प्रवाशांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे टीटीई बर्थ नाकारू शकणार नाहीत. दुसरीकडे, प्रवाशांना पीएनआर चौकशीदरम्यान ग्राफिकल कोच लेआउटमध्ये पीएनआरला नेमलेल्या जागांची नेमकी स्थिती पाहण्याची सुविधादेखील प्रवाशांना मिळणार आहे.

ऑनलाईन चाटर्स् कसे पहावे

आयआरसीटीसी वेबसाइटवर (आयआरसीटीसी. कॉम) चार्ट व रिक्त स्थान नावाचा एक नवीन पर्याय उपलब्ध केला आहे. एका ऑनलाइन चार्टप्रमाणे आहे, त्यावर क्लिक करून आणि गाडी क्रमांक टाकून, त्या गाडीच्या रिक्त जागांविषयी माहिती मिळवता येणे शक्य झाले आहे. त्यानंतर आपण टीटीईला भेट देऊन आणि आपले वेटिंग तिकिट दाखवून या रिक्त जागांसाठी कन्फर्म तिकिट मिळवता येणार आहे. 

तर कन्फर्म तिकिट मिळणार

ऑनलाईन तिकिट चार्ट हा रेल्वेने प्रवास करणाऱया प्रवाशांना पाहता येणार आहे. घरबसल्या मोबाईलवरदेखील ही सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रवशांची सोय झाली आहे. कोणत्याही गाडीचे सीट व गाडी क्रमांक टाकल्यानंतर त्यांना कन्फर्म तिकिट मिळणार आहे. टीटीईकडे जावे लागणार नाही. वेटिंग तिकिट असले तरी जागा रिक्त असली तर प्रवाशांना टीटीईकडे भेटून तिकिट कन्फर्म करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा होणारा त्रास यामुळे कमी होणार आहे.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये १६ कोरोनाबाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

जोतिबा दर्शन घेऊन परतताना झालेल्या अपघातात एक ठार

Abhijeet Shinde

प्लेगमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सावरकरांचे आदर्श रूप

Abhijeet Shinde

विषारी घोणसच्या दंशाने उपचारापुर्वीच महिलेचा मृत्यू

Abhijeet Shinde

..म्हणून जन्मदात्या बापाने मुलाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड

Abhijeet Shinde

सोलापूर : कोरोनाबाधितांचा शहरात मुक्त वावर ; प्रशासनाचा हलगर्जीपणा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!