Tarun Bharat

धूम्रपान सोडा, 40 हजार मिळवा

ब्रिटनमधील एका शहरात लागू होणार योजना

धूम्रपानाचे प्रमाण कमी करण्यासाठी एका शहरात प्रायोगिक तत्वावर एक योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेनुसार धूम्रपान सोडणाऱया व्यक्तीला 20 हजार रुपये रोख देण्याची तरतूद आहे. तर गरोदर महिलांना या योजनेच्या अंतर्गत दुप्पट रक्कम देण्यात येणार आहे.

ही योजना ब्रिटनच्या एका शहरात राबविण्यात येणार आहे. काही काळापासून या शहरातील धूम्रपानाचे प्रमाण वाढत चालल्याने ही योजना हाती घेण्यात आली आहे. धूम्रपानाची आकडेवारी पाहता ब्रिटनच्या चेशायर ईस्टच्या या योजनेत गरोदर महिलांनाही सामील करण्यात आले आहे.

योजनेनुसार धूम्रपान सोडणाऱयांना सुमारे 20 हजार रुपये तर गरोदर महिलांनी धूम्रपानाला रामराम ठोकल्यास त्यांना सुमारे 40 हजार रुपये देण्यात येतील. ही योजना यशस्वी ठरल्यास देशातील अन्य भागांमध्येही ती लागू करण्याचा विचार सुरू आहे.

एखाद्या व्यक्तीने धूम्रपान सोडण्याचा दावा केल्यास त्याला एका परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. स्वतःचा दावा सिद्ध करण्यासाठी एक्सहेल्ड कार्बन मोनोऑक्साइड टेस्ट्स द्यावे लागतील.

धूम्रपान सोडणाऱयांना 20 हजार तर गरोदर महिलांना 40 हजार रुपये हप्त्यांच्या स्वरुपात देण्यात येतील. आर्थिक प्रोत्साहन योजना लोकांच्या मदतीसाठी एक उपयुक्त पद्धत असल्याचे वारंवार दिसून आल्याचे चेशायर ईस्ट कौन्सिलच्या अहवालात म्हटले गेले आहे.

एका दिवसात 20 वेळा धूम्रपान करणारे लोक वर्षाला याकरता 4.4 लाख रुपये खर्च करतात. याचबरोबर 70 टक्के फुफ्फुसांच्या कर्करोगाचे रुग्ण हे धूम्रपानाची पार्श्वभूमी बाळगलेले असतात. धूम्रपानामुळे याचबरोबर आणखीन अनेक आजार होत असतात. शहराकडून या योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. एक समिती या योजनेवर देखरेख ठेवणार आहे.

Related Stories

कुटुंबासोबत भोजन करणे आरोग्यदायी

Amit Kulkarni

सर्वात महागडी बियर

Patil_p

पुणे : मंडई गणपतीची यंदा मंदिरातच प्रतिष्ठापना

Tousif Mujawar

महाराष्ट्राच्या अथर्व लोहार आणि देवेश भईया ला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

prashant_c

जगातील सर्वात मोठे मांजर

Patil_p

या गावात पादत्राणे घालण्यावर बंदी

Amit Kulkarni