Tarun Bharat

धोकादायक पोर्तुगीजकालीन घरांची पाहणी करणार

Advertisements

महपौर उदय मडकईकर यांची माहिती

प्रतिनिधी / पणजी

राजधानी पणजीत पोर्तुगीजकालीन अनेक घरे अत्यंत जीर्ण झालेल्या अवस्थेत आहेत. बऱयाच काळापासून ही घरे बंद पडून आहेत. त्यामुळे या घरांची पडझड सुरू झाली आहे. काल पोस्ट कार्यालयाच्या मागील भागातील एक इमारत कोसळली. महापालिकेचे महापौर उदय मडकईकर, तिसवाडीचे मामलेदार राहूल देसाई, नगरसेवक विठ्ठल चोपडेकर व मनपाच्या अधिकाऱयांनी यावेळी जाऊन पाहणी केली. तसेच अन्य जीर्ण घरांची पाहणी करण्यासाठी मनपातर्फे एक पथक तयार करण्याचाही निर्णय घेतल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले.

पोस्ट इमारत भागापासून कोर्तीन, मळापर्यंत पोर्तुगीजकालीन अनेक घरे आहेत. बरीच घरे ही वास्तव्याविना बंद पडून आहेत. बरीच जुनी असल्याने ही घरे आता अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. त्याचबरोबर या घरांची पडझड सुरू झाली आहे. देखरेखीविना व दीर्घकाळ बंद राहिल्याने काही भागांची पडझड झालेली आहे. या घरांचे मालक कोण किंवा कुठे आहेत हेही माहित नाही. जीर्ण झालेल्या या घरामुळे बाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळय़ात घरे कोसळल्यास बाजूच्या घरांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेजारील घरातील लोकही भीतीच्या छायेखाली आहेत.

मनपाकडून जुन्या घरांची पाहणी होणार

अनेक वर्षापासून या पोर्तुगीजकालीन घरांची डागडुजी केलेली नाही. त्यामुळे ही घरे कधी कोसळतील हेही सांगता येत नाही. या घराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मनपाला नाही, मात्र ही घरे धोकादायक ठरल्याने बाजूच्या घरातील लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशी घरे कोसळल्यानंतर मातीचे ढिगारे मात्र मनपाला हलवावे लागतात. अशा प्रकारची जीर्ण घरे किती आहेत याची पाहणी आता मनपा करणार आहे. त्यासाठी मनपा, साबांखा यांचे अभियंते, मामलेदार यांची एक टीम तयार केली जाणार आहे. ही टीम या घरांची पाहणी करून अहवाल तयार करणार आहे.

Related Stories

चोर्लातून बेळगावात जाणाऱया वाहनांची तपासणी

Amit Kulkarni

महागणपती पूजनाचा दिल्लीत महासोहळा

Amit Kulkarni

सत्तरी तालुक्मयात फणसाचे अगणित पीक वापराचे कौशल्य नसल्यामुळे पिकांची मोठय़ा प्रमाणात हानी

Omkar B

दूध उत्पादकांच्या मागण्या 10 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा

Amit Kulkarni

पंधरा लाखाच्या ड्रग्जसह नायजेरियनास अटक

Omkar B

ज्ञान-मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी नवीन धोरण उपयुक्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!