Tarun Bharat

धोका वाढला : जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाबाधितांनी ओलांडला 61 हजारांचा टप्पा

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. मागील 24 तासात 1,330 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 15 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 61 हजार 041 वर पोहोचली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, काल मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 672 आणि काश्मीर मधील 784 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 20 हजार 770 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 11,823 आणि काश्मीरमधील 8,947 जण आहेत. 


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 39 हजार 305 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 9223 रुग्ण जम्मूतील तर 30,082 जण काश्मीरमधील आहेत. 


तर आतापर्यंत 966 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 209 जण तर काश्मीरमधील 757 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 28 हजार 841 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 20 हजार 770 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत. 

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये यंदा 165 दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

शनिवारी उच्चांकी 3,860 जण कोरोनामुक्त

Patil_p

रक्षाबंधनातून जवानांप्रती आदरभाव!

Amit Kulkarni

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापार करारविषयक चर्चा सुरू

Patil_p

बेळगावात संचारबंदी धर्तीवर लॉकडाऊन

tarunbharat

कोरोनाग्रस्तांसाठी ओडिशाकडून देशातील सर्वात मोठे रुग्णालय

tarunbharat