Tarun Bharat

धोका वाढला : पंजाबमध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 2.20 लाखांचा टप्पा

  • बुधवारी 2,634 नवे कोरोना रुग्ण ; 39 मृत्यू 

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने 31 मार्च पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच बुधवारी 2 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. मागील 24 तासात 2634 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर  39 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 20 हजार 276 इतकाझाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 1,455 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,20,276 रुग्णांपैकी 1 लाख 93 हजार 280 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 474 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 20 हजार पेक्षाअधिक रुग्ण ॲक्टिव्ह  


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 57 लाख 03 हजार 944 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 20 हजार 522 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 293 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 29 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

कोरोनाचा औषधांच्या किमतींवरही पडतोय प्रभाव

Patil_p

‘पँगाँग’मध्ये दोन्ही देश विजयाच्या स्थितीत

Patil_p

प्रीमियम रेल्वेत मनोरंजनाची सुविधा

Patil_p

कृषी विधेयकावरून हिंसक वळण ; इंडिया गेटजवळ पेटविला ट्रॅक्टर

Tousif Mujawar

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची मोदींनी केली पाहणी

Patil_p

आर्यनची 26 दिवसांनी मन्नत पूर्ण

Patil_p