Tarun Bharat

धोका वाढला : महाराष्ट्रात 25,833 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 25 हजार 833 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 23 लाख 96 हजार 340 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 53 हजार 138 एवढा आहे. 


कालच्या एका दिवसात 12,764 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 21 लाख 75 हजार 565 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 1 लाख 66 हजार 353 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.79 % तर मृत्युदर 2.22 इतका आहे. 

  • मुंबईत 18,424 ॲक्टिव्ह रुग्ण 


मुंबईत कालच्या दिवसात 2,877 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 8 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 1193 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,52,835 वर पोहचली आहे. तर 3,21, 947 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,555 इतकी आहे. सद्य स्थितीत 18 हजार 424 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Related Stories

शिस्तबद्ध संचलनाने NDA चा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात

datta jadhav

उदयनराजेंकडून शहरातल्या कामांची पहाणी

Patil_p

राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान; कोल्हापुरात एकमेव ग्रामपंचायतीत मतदान

Archana Banage

‘MPSC’चे आता स्वतंत्र ॲप

datta jadhav

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ईडीसमोर हजर राहणार – अनिल देशमुख

Archana Banage

बत्तीसवेळा पत्रव्यवहार तरीही ‘आरोग्य’च्या सेवेची नाही दखल

Patil_p