Tarun Bharat

धोका वाढला : महाराष्ट्रात मागील 24 तासात 11,088 नवे कोरोना रुग्ण; 256 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. राज्यात मागील चोवीस तासात 11 हजार  088  नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 35 हजार 601 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात 256 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी एका दिवसात 10,014 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे आतापर्यंत 3 लाख 68 हजार 435 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  68.79 टक्के इतके आहे. 
सध्या राज्यात 1 लाख 48 हजार 553 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 18 हजार 306 वर पोहोचला आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.42 टक्के इतके आहे. 


सध्या राज्यात 10 लाख 04 हजार 233 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 648 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

उत्तरप्रदेशात महिलेला फाशी देण्याची तयारी

Patil_p

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

Abhijeet Khandekar

येडियुराप्पांना धक्का ! मुलगा विजयेंद्रला मंत्रिमंडळात स्थान नाही

Archana Banage

भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू

Tousif Mujawar

यूपीत आजपासून लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी कायदा लागू

datta jadhav

‘देशात कोरोनाच्या काळात भाजपने हत्याकांड घडवण्याचं पाप केलं’; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Archana Banage