Tarun Bharat

धोनीचा संताप …अन् पंचांनी चक्क ‘तो’ निर्णयच बदलला!

आयपीएल 13 व्या हंगामातील 29 व्या लढतीत मंगळवारी चेन्नई सुपरकिंग्स संघाने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सहज विजय संपादन केला. पण, या लढतीदरम्यान एक अजब घटना सर्वांनाच आश्चर्यचकित करुन जाणारी ठरली. कारण, यावेळी धोनीचा संतापी हावभाव चक्क पंचांना आपला निर्णय बदलण्यास भाग पाडले. वास्तविक, तेथे मैदानी पंच पॉल राफेल एक चेंडू वाईड ठरवणार होते. पण, त्यांनी वाईडचा इशारा देण्यासाठी दोन्ही हात फैलावले आणि त्याचवेळी धोनीचा संताप अनावर होत हे अनोखे नाटय़ घडले.

हैदराबादविरुद्ध या लढय़ात चेन्नईने 20 धावांनी विजय संपादन केला. 7 सामन्यात 5 पराभव स्वीकारणाऱया चेन्नईसाठी हा विजय खूपच सुखावणारा, दिलासा देणारा ठरला. धोनीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 167 धावा जमवल्या. विजयासाठी 168 धावांचा पाठलाग करणाऱया हैदराबाद संघाला 20 षटकात 8 बाद 147 धावापर्यंतच मजल मारता आली.

अर्थात, या लढतीतील 19 व्या षटकातील नाटय़ सर्वांना अचंबित करणारे ठरले. हे षटक शार्दुलने टाकले. त्याचा एक चेंडू जवळपास वाईड भासावा, असा होता आणि मुख्य पंच पॉल राफेल यांनी वाईड देण्यासाठी आपले हातही फैलावले. पण, पंच हा चेंडू वाईड देणार, याची कुणकूण लागताच धोनीने पंचांकडे पाहत संतापाने हातवारे केले आणि आश्चर्य म्हणजे पॉल राफेल यांनी तो संताप अगदीच गांभीर्याने घेत वाईडची खुण करणेच टाळले. टीव्ही स्क्रीनवर यावेळी चेन्नईचा कर्णधार धोनीप्रमाणेच सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची छबीही दाखवण्यात आली आणि वॉर्नरने पंचांबद्दल निराशा व्यक्त करणे त्यावेळी साहजिकच होते.

अर्थात, एखाद्या खेळाडूच्या संतापामुळे पंचांनी आपला निर्णय बदलणे अनेक क्रिकेट रसिकांना रुचले नाही आणि सोशल नेटवर्कवर याच्या अनेक प्रतिक्रिया उमटत राहिल्या. काहींनी धोनीवर पंचांवर प्रभाव टाकल्याची टीका केली तर काहींनी हा निर्णय तिसऱया पंचांकडे का सोपवला नाही, अशी विचारणा केली. एका चाहत्याने तर सध्या सामन्यादरम्यान प्रसारित होणाऱया एका जाहिरातीचा संदर्भ घेत कहरच केला. यात तो चाहता म्हणाला, धोनी टू अम्पायर….मै ये वाईड का सिग्नल कर लेता हूँ….तब तक आप ड्रीम इलेव्हन पे टीम बना लो!

Related Stories

विराट, रोहितचे वनडेतील स्थान कायम

Patil_p

नियम बदलण्याऐवजी मार्केटिंगवर भर द्यावा

Patil_p

विजेंदर सिंग-सुले मुष्टियुद्ध लढत 17 ऑगस्टला

Patil_p

फिलिपाईन्सला नमवून कोरिया अंतिम फेरीत

Amit Kulkarni

अवनी लेखराला नव्या विश्वविक्रमासह सुवर्ण

Patil_p

लंका दौऱयासाठी शिखर धवनकडे नेतृत्व?

Patil_p