Tarun Bharat

धोनीच्या टीम इंडियातील कमबॅकबाबत गांगुली म्हणतो..

Advertisements

ऑनलाईन टीम / कोलकाता

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या टीम इंडियातील कमबॅकबाबत चाहत्यांना उत्सुकता असतानाच बीसीसीआयने धोनीला करारातून वगळले. त्यानंतर धोनीच्या कमबॅकवरून संभ्रम निर्माण झाला आहे. यावर बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

धोनीने त्याच्या आगामी क्रिकेट भवितव्याबाबत कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी नक्कीच चर्चा केली असेल. त्यामुळे याविषयी बोलण्याची ही योग्य वेळ नाही, असे गांगुलीने म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना गांगुलीने धोनीची स्तुती केली. धोनी हा टीम इंडियाचा स्टार खेळाडू असून असा खेळाडू परत मिळणे कठीण आहे. त्यामुळे आपल्या करिअरबाबत निर्णय घेण्याचा अधिकार धोनीला आहे. मी अद्याप त्याच्याशी बोललो नाही. मात्र आता खेळायचं की नाही हे धोनीलाच ठरवायचं आहे, असेही गांगुली म्हणाला.

दरम्यान, २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकाचा सेमीफायनलचा सामना धोनीने खेळलेला शेवटचा सामना आहे. त्यानंतर धोनीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. त्यातच विंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी धोनीने आर्मी ट्रेनिंगला जाण्याचा कारण देत दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. त्यानंतरही तो आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. मात्र नव्या वर्षात तो पुनरागमन करेल अशी चाहत्यांना आशा आहे.

Related Stories

सातव्या स्थानावरील राजस्थानसमोर आज चेन्नईचे आव्हान

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघ कोरोनामुळे स्पर्धेतून बाहेर

Patil_p

अँडरसनचे प्रथमश्रेणीतील 1000 बळी

Patil_p

ऍन मारियाचा वेटलिफ्टींगमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम

Amit Kulkarni

चेन्नईचा प्रणव भारताचा 75 वा ग्रँडमास्टर

Patil_p

व्हेट्टेलला सलग दुसरी शर्यत हुकणार

Patil_p
error: Content is protected !!