Tarun Bharat

धोनीच्या ट्विटरवरून ‘ब्लू’ टिक हटवली

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ट्विटर हँडलवरील व्हेरीफिकेशन मार्क म्हणजेच ‘ब्लू टिक’ काढून घेतली आहे. धोनीचे ट्विटर अकाऊंट सक्रिय नसल्याने ब्लू टिक काढल्याची माहिती मिळत आहे. धोनीच्या अकाऊंटवर 8 जानेवारी 2021 ला शेवटचे ट्विट पाहायला मिळत आहे. धोनीच्या ट्विटरवर सध्या 8.2 मिलियन फॉलोवर्स असून तो फक्त 33 लोकांना फॉलो करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार अनेक प्रसिद्ध व्यक्तींची ब्लू टिक ट्विटरने काढून घेतली होती. मागच्याच महिन्यात ट्विटरने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर खात्यावरून ब्ल्यू टिक काढून टाकली. मात्र, नंतर ती पूर्ववत करण्यात आली.

Related Stories

झारखंडमध्ये 7 नक्षलवाद्यांना अटक

Patil_p

गेहलोत-पायलट दोघेही काँग्रेससाठी बहुमूल्य

Patil_p

TMC च्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

datta jadhav

हरविंदर रिंदा दहशतवादी घोषित

Patil_p

मान यांच्यावरील आरोपांमध्ये केंद्र लक्ष घालणार

Patil_p

युटय़ूबद्वारे पैसे कमविणे आता अवघड

Patil_p