Tarun Bharat

धोनी सर्वात महान कर्णधार :पीटरसन

Advertisements

लंडन :

महेंद्रसिंग धोनी हा माझ्या मते जगातील सर्वोत्तम कर्णधार असल्याचे प्रतिपादन इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनने केले आहे.

धोनीने कप्तानपदाच्या कारकीर्दीत भारताला दोनवेळा दोन विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. क्रिकेट क्षेत्रातील धोनीच्या कामगिरीबाबत शंका घेणे अवघड असल्याचे पीटरसनने म्हटले आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 2007 साली आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तर 2011 साली आयसीसीची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली.

त्याचप्रमाणे धोनीच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. गेल्या जुलैमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले होते. या सामन्यानंतर धोनीने आजपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व धोनीकडे सोपविले असून तो या स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याने 2010, 2011 आणि 2018 साली चेन्नाई सुपर किंग्जला तीनवेळा आयपीएल चषक मिळवून दिला आहे.

गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने 2012 आणि 2014 साली दोनवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली होती. मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धा चारवेळा जिंकली आहे. 2019 आयपीएल स्पर्धेत विंडीजच्या रस्सेलने आपल्या उत्तुंग षटकारांच्या जोरावर मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून दिले आणि या स्पर्धेत तो मालिकावीर ठरला होता, असे 104 कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करणाऱया केव्हिन पीटरसनने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Related Stories

फडणवीसांनी एेकलं असत तर…;आदित्य ठाकरेंचं मुनगंटीवारांना उत्तर

Abhijeet Khandekar

नवनीत राणांना तुरुंगात अमानवीय वागणूक, लोकसभा अध्यक्षांनी मागवला अहवाल

Abhijeet Shinde

राधानगरी धरण ६० टक्के भरले,१४०० क्यूसेकने विसर्ग सुरू

Abhijeet Khandekar

पैलवान पृथ्वीराज पाटीलने कुस्तीपंढरी कोल्हापूरची उंचावली शान

Abhijeet Shinde

दिल्ली : 1 सप्टेंबरपासून सुरू होणार 9 वी ते 11 वी पर्यंतच्या शाळा ?

Rohan_P

आग्रा : आठवड्यातील 2 दिवसीय लॉकडाऊनचे नियम आता अधिक कडक

Rohan_P
error: Content is protected !!