Tarun Bharat

धोम कालव्यात आढळला कामगाराचा मृतदेह, एक जण बेपत्ता

Advertisements

वाई : वाई एमआयडीसी येथील एका कंपनीत काम करणारे नरेश धर्मदासजी (वय 20, रा.दिल्ली),बिरु (पूर्ण नाव समजू शकले नाही) हे दोघे दि.6 रोजी दुपारी बेपत्ता झाले होते. त्यापैकी नरेश याचा मृतदेह धोम कालव्यात दि.7 रोजी आढळून आला असुन, दुसऱ्या कामगाराचा शोध वाई पोलीस घेत आहेत.

वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई येथील एका कंपनीत काम करणारे नरेश आणि बिरु हे दि.6 रोजी दुपारी 2 वाजता काही न सांगता निघून गेले. ते सायंकाळी उशिरापर्यत न आल्याने कंपनीचे व्यवस्थापक रणजित मंडले यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शोध घेतला.परंतु ते दोघे न सापडल्याने दि.7 रोजी दुपारी 12 वाजता वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतल्या कालव्यात मृतदेह आढळून आल्याची माहिती वाई पोलिसांना मिळताच वाई पोलीस ठाण्याचे जवान प्रशांत शिंदे, किरण निंबाळकर, धुळे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला.कंपनीचे व्यवस्थापक मंडले यांनी तो मृतदेह नरेश याचा असल्याची खात्री केली. रात्री शवविच्छेदन करण्यासाठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.दरम्यान बेपत्ता बिरुचा शोध वाई पोलीस घेत असून याचा तपास सहाय्यक फौजदार कोळी हे करत आहेत.

Related Stories

सातारा : रयत शिक्षण संस्थेसमोर अभाविपने केली निदर्शने

Abhijeet Shinde

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकास मारहाण

datta jadhav

सद्भावना दौडचे कराडमध्ये स्वागत

Amit Kulkarni

सातारा जिल्ह्यात ८७५ जण कोरोनाबाधित ; तर ११ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

ग्रामपंचायती डिजिटल करण्याचे काम सुरु.

Patil_p

रामराजे-उदयनराजेंमध्ये कमराबंद चर्चा

datta jadhav
error: Content is protected !!