Tarun Bharat

ध्वजारोहणावेळी काँग्रेस नेत्यांच्यात हाणामारी

Advertisements

ऑनलाईन टीम/इंदूर

देशात सर्वत्र 71 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात पार पडला. राज्यभरात ठिकठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडत असतानाच मध्यप्रदेशमध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यानच काँग्रेस नेत्यामध्ये हाणामारीचा प्रसंग घडला आहे. इंदूरमधील काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात ही घटना घडली. देवेंद्रसिह यादव आणि चंदू कुजीर या दोघां नेत्यांच्यात ही हाणामारी झाली. नेत्यांमध्ये झालेल्या या हाणामारीत शेवटी कार्यकत्याना आणि पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली.

मुख्यमंत्री कमलनाथ इंदूरमधील काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहण करणार होते. त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, देशाच्या संस्कृती आणि राज्यघटनेच्या विरोधात जाण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना तीव्र विरोध केला जाईल.

Related Stories

फुटबॉलच्या सामन्यादरम्यान कोसळली प्रेक्षक गॅलरी, 200 हून अधिक जखमी

datta jadhav

मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये 3 नक्षलवाद्यांचा खात्मा

Patil_p

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; मागील २४ तासात ८ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; दोघांचा मृत्यू

Patil_p

दिल्ली विमानतळावर 45 पिस्तुले जप्त

Patil_p

यूपी : ऑनलाईन नोंदणी केल्यावरच 45 पेक्षा अधिक वय असलेल्यांना मिळणार लस

Rohan_P
error: Content is protected !!