Tarun Bharat

नंगानाच करणाऱया टोळक्यावर दरोडय़ाचा गुन्हा

धारदार शस्त्राने वार केल्याने एकजण जखमी

सातारा / प्रतिनिधी

शहरातील विसावा नाका ते खेड चौकापर्यंत गाडय़ांची तोडफोड करुन हातात धारदार शस्त्रे घेवून नंगानाच करणाऱया सहा जणांच्या टोळक्यावर सशस्त्र दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरबझार येथील शिवांजली सोसायटीत दि. 12 रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करुन सशस्त्र दरोडा टाकत सोन्याचे दागिणे, रोख रक्कम असा एकूण 31 हजार 150 रुपयांचा ऐवज सहा जणांनी चोरुन नेला. यामध्ये उमेश आप्पाराव गायकवाड (वय 24, रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी, सदरबझार सातारा) हा युवक जखमी झाला आहे.

याप्रकरणी अमिर शेख (रा. वनवासवाडी, सातारा), आयुष भिसे, ओंकार भिसे, आकाश पवार, गोटय़ा जाधव, शुभम बगाडे (सर्व रा. मोळाचा ओढा, सातारा) या सहा जणांच्या टोळक्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच टोळक्याने शहरातील विसावा नाका, खेड चौक, शिवांजली सोसायटीत गाडय़ा फोडत हातात कोयते, तलवारी, गुप्तीसारखी धारदार शस्त्रs नाचवत नंगानाच केला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, अमिर शेख, आयुष भिसे, ओंकार भिसे, आकाश पवार, गोटय़ा जाधव, शुभम बगाडे या सहा जणांच्या टोळक्याने दि. 12 रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास शहरात राडा केला. हातात धारदार शस्त्रs नाचवत विसावा नाका ते खेड चौक दरम्यान रस्त्यात असलेल्या गाडय़ांची तोडफोड करत दहशत निर्माण केली. यावेळी दुकानदारांची धावपळ उडाल्याने त्यांनी आपली दुकाने बंद केली. यामुळे तणाव पसरला होता. दरम्यान, सदरबझार येथील शिवांजली सोसायटीत दोन मोटरसायकलवरुन आलेल्या या टोळक्याने सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी त्यांनी उमेश गायकवाड यांच्यावर कोयता व गुप्ती यांसारख्या धारदार शस्त्राने डोक्यात व हातावर वार केले. तसेच त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चेन, पँन्टच्या खिश्यातील महत्वाची कागदपत्रे असलेले व 1100 रुपये असलेले पाकीट असा एकून 31 हजार 150 रुपयांचा ऐवज काढून घेतला. धारदार शस्त्राने वार केल्याने उमेश गायकवाड जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेतच सहा जणांनी जिन्यावरुन फरफटत आणून त्याच्या भावच्या घराच्या गेटजवळ सोडून पळून गेले.

याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून उमेश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन  अमिर शेख, आयुष भिसे, ओंकार भिसे, आकाश पवार, गोटय़ा जाधव, शुभम बगाडे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीक तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम करीत आहेत. घटनेची माहीती कळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.

Related Stories

”स्पर्धा परिक्षा करणाऱ्या ”त्या” युवकाच्या आत्महत्येला राज्यसरकार जबाबदार”

Archana Banage

कोणताही व्हेरिएंट येवो, दो गज दुरी; मास्क है जरुरी !

Archana Banage

पिक विमा संरक्षणामध्ये स्ट्रॉबेरीचा समावेश

Patil_p

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये 40 बेडचा अत्याधुनिक वॉर्ड

Archana Banage

अकरा धारदार शस्त्रांसह एकास अटक

datta jadhav

ग्वाल्हेरमधील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 46 व्यक्तींची तपासणी पूर्ण

Archana Banage