Tarun Bharat

नंदगडमध्ये हमीभावाने भात खरेदीसाठी नोंदणी सुरू

वार्ताहर / नंदगड

सरकारतर्फे सामान्य भाताला 1868 व ए ग्रेड (उच्च प्रतिच्या) भाताला 1888 रुपये हमीभावाने भात खरेदी करण्यात येणार आहे. नंदगड येथील एपीएमसीच्या कार्यालयात भात विक्री करणाऱया शेतकऱयांची नोंदणी करण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत खानापूर तालुक्यातील चार शेतकऱयांनी आपली नावे नोंदविली आहेत.

भात विक्री करण्यासाठी शेत जमिनीचा उतारा, शेतकऱयांचे आधारकार्ड, बँक पासबुक, प्रुट आयडी आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. एका शेतकऱयाकडून 75 क्विंटल भात खरेदी करण्यात येणार आहे. तर 1 एकर जमीन धारकाला किमान 25 क्विंटल भात विक्री करता येणार आहे. स्वच्छ व सुकलेले भात खरेदीले जाणार आहे. त्यासाठी कागदपत्रासह येताना शेतकऱयाने एक किलो भात शॅम्पल (नमुना) साठी आणणे गरजेचे आहे. भात सुतळीच्या पोत्यातूनच आणावे, पोत्यासाठी शासनाकडून 6 रु. दिले जाणार आहेत.

शेतकऱयांची नोंदणी सुरू

कर्नाटक राज्य सहकार विक्री महामंडळाचे कर्मचारी आर. टी. कबाडद यांची  शेतकऱयांची नावे घेण्यासाठी निवड करण्यात आली आहे. महिन्याच्या दुसऱया व  चौथ्या शनिवारी वगळता रोज कार्यालयीन वेळेत अधिकारी नंदगड येथील एपीएमसीच्या कार्यालयात नावे नोंद करुन घेणार आहेत. डिसेंबरच्या 30 तारखेपर्यंत नावे नेंदणी सुरू राहणार आहे.

भाताची होणार तपासणी

विक्री करण्यासाठी आणलेले भात स्वच्छ असले पाहिजे, त्यामध्ये माती, खडे व कचरा असता कामा नये, शिवाय भात सुकलेले असले पाहिजे, नंदगड येथे एकवेळ भाताचा दर्जा तपासण्यात येणार आहे. त्यानंतर ते अधिक तपासणीसाठी अन्यत्र पाठविण्यात येणार आहे.

खरेदी कोठे व कधी?

भात खरेदी केंद्र यावर्षी नंदगड येथे सुरू राहणार आहे. कारण यापूर्वी दोनवेळा नंदगड एपीएमसी आवारात भात विक्री करण्यात आली होती.

खानापुरातील भात गिरणी मालकाची पाठ

खानापूर व बेळगाव तालुक्यातील भात गिरणी मालकांनी सदरचे खरेदी केलेले भात विकत घ्यावे, यासाठी संबंधित अधिकाऱयांमार्फत गिरणी मालकाना विनंती करण्यात आली आहे. मात्र सदरचे भात खरेदी करण्यास त्यांच्याकडून नकार मिळाला आहे. त्यामुळे सदर खरेदी केलेले भात परजिल्हय़ात जाण्याची शक्यता आहे. भाताचे टेंडर ज्यांच्या नावे होणार आहे. त्या पार्टीकडून भात खरेदी होणार आहे. त्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱयांनी आपली नावे नोंदविणे शेतकऱयांच्या दृष्टीने हितावह आहे. यावेळी भात विक्री नोंदणी अधिकारी आर. टी. कबाडद यांच्यासह नंदगड एपीएमसीचे सेक्रेटरी जी. पी. कबेराली, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मधु कवळेकर,  झुंजवाडचे माजी ग्रा. पं. सदस्य आप्पाजी पाटील व शेतकरी बसय्या हिरेमठ कक्केरी, शिवाजी धबाले झुंजवाड आदीसह अन्य शेतकरी उपस्थित होते.

हमीभाव दराचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा

सरकारने सामान्य भातासाठी 1868 व ए ग्रेड भातासाठी 1888 रुपये दराने भात खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तो आजच्या बाजारभावापेक्षा दोनशे ते तीनशे रुपयानी अधिक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदगड एपीएमसीचे अध्यक्ष हणमंत पाटील यांनी केले आहे.

Related Stories

खराब सोयाबिन बियाणे उगवली नसल्याने नुकसान भरपाई द्या

Patil_p

शहापुरात वाघनखे, हस्तिदंताच्या अंगठय़ा जप्त

Patil_p

कपिलनाथ युवक मंडळातर्फे मास्क-सॅनिटायझरचे वाटप

Amit Kulkarni

शनिवारपासून भाजीमार्केट एपीएमसीत भरणार?

Patil_p

पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता 4 टक्क्यांवर

Amit Kulkarni

फिनोलेक्सतर्फे प्लम्बिंग डे साजरा

Omkar B