Tarun Bharat

नंदगड गाव आजपासून पूर्णतः सीलडाऊन

ग्रामपंचायतीने बांबू लावून ठिकठिकाणचे रस्ते केले बंद : विनाकारण फिरणाऱयांवर होणार कारवाई

वार्ताहर / नंदगड

नंदगड गावात कोरोना रोगाचे प्रसार जोरात वाढला आहे. कोरोनाने डझनभर लोक बळी गेले आहेत. विविध कामानिमित्त परगावी गेलेले लोक मोठय़ा प्रमाणात गावात परतत आहेत. त्यामुळे गावात गर्दी वाढत आहे. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आता ग्रामपंचायतीने गावची पूर्व व दक्षिणेकडील प्रवेशद्वारे बांबूच्या काठय़ा लावून बंद केली आहेत. खानापूर-हलशी रस्त्यावर दोन ठिकाणी गेट बसविण्यात येणार असून आवश्यक असेल तरच या गेटमधून पुढे जाऊ दिले जाणार आहे. अन्यथा, विनाकारण फिरणाऱयांवर कारवाई केली जाणार
आहे.

 नंदगडमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नंदगड गाव सीलडाऊन करण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून सीलडाऊन करण्यात येणार आहे. रविवारी दुपारपासून सर्व रस्ते बांबूच्या काठय़ा लावून बंद करण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचाऱयांनी सुरू केले आहे. हलशीहून नंदगड गावात येणाऱयांना कलाल गल्लीच्या प्रवेशद्वाराजवळ बांबू लावून रस्ता बंद करण्यात आला आहे.

निलाकरी हॉटेलजवळ रस्ता बंद पूर्व भागातून येणाऱया लोकांसाठी निलाकरी हॉटेलजवळ बांबू लावून सदर रस्ता बंद करण्यात आला आहे. बाजारपेठेत कोणी घुसू नये म्हणून चावडीजवळ बांबू लावून रस्ता बंद केला आहे. यामुळे गावात जाणारे तीन रस्ते बंद झाले आहेत. खानापूर-हलशी रस्त्यावर महात्मा गांधी कॉलेजजवळ तसेच कोंडवाडय़ाजवळ दोन गेट बसविण्यात येणार आहेत. उपचारासाठी जाणाऱया रुग्णांना किंवा अत्यावश्यक काम असणाऱया लोकांना या गेटमधून पुढे सोडण्यात येणार आहे. त्यासाठी रस्त्यावरून जाणाऱयानी आवश्यक ती माहिती देणे गरजेचे आहे. विनाकारण गावात फिरणाऱयांना तसेच जाण्यासाठी प्रयत्न करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार
आहे. ग्रामपंचायतीने प्रमुख रस्ते बांबू लावून बंद केले असले तरी, गावात फिरणाऱयांवर निर्बंध घालण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात असल्याने गाव सीलडाऊन करणे हा एकमेव पर्याय आहे, असा अभिप्राय दोन दिवसांपूर्वी नंदगडात घेतलेल्या बैठकीत स्थानिक डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यानुसार गाव सीलडाऊन करण्याचा निर्णय घेतला. आगामी 15 दिवस गाव सीलडाऊन करण्यात आले असले तरी डॉक्टरांकडून मात्र रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. तशी हमी डॉक्टरांनी ग्रामस्थांना दिली आहे. त्यामुळे नंदगड व परिसरातील रुग्णांची सोय होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून नंदगड ग्रामस्थांनी सीलडाऊनचा घेतलेला निर्णय आरोग्याच्यादृष्टीने हितकारक आहे.

Related Stories

गुढीपाडव्याला धावणार विविध मार्गांवर जादा बस

Amit Kulkarni

खानापूर तालुक्मयातील जनता कोरोनामुळे भयभीत

Patil_p

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Amit Kulkarni

इंडियन बॉईज, आर्मी इलेव्हन, यमकनमर्डी, श्री स्पोर्ट्स खडकगल्ली विजयी

Amit Kulkarni

समर्थ सोसायटीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन

Amit Kulkarni

वडगाव रोडवरील उघडय़ा डेनेज चेंबरचा वाहनधारक-नागरिकांना धोका

Amit Kulkarni