Tarun Bharat

नंदगाव येथे जमिनीच्या वादातून एकाचा मृत्यू

प्रतिनिधी / चुये

नंदगाव तालुका करवीर येथे जमिनीच्या वादातून मुजावर आणि चौगुले कुटुंबीय यांच्यात झालेल्या मारामारीत गंभीर जखमी झालेल्या फरुदीन बाबासाहेब मुजावर वय 45 याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला बुधवारी सकाळी हा वाद झाला होता याप्रकरणी संदीप बाळू चौगुले सागर बाळू चौगुले यांच्यावर इस्पुरली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला पोलिसांनी अटक केली आहे. तर या मारामारीत चौगुले कुटुंबातील बाळू चौगुले हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मुजावर आणि चौगुले कुटुंबामध्ये कित्येक वर्षापासून हा जमिनीचा वाद सुरू होता बुधवारी सकाळी मयत फरुदीन मुजावर व बाळू दादू चौगुले या दोघांमध्ये या जमिनीच्या वादातून शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर या वादाची मारामारीत रूपांतर झाले, यावेळी बाळू घुले यांच्या डोक्याला जोरात मार लागला त्यामुळे आपल्या वडिलाला झालेल्या मारामारीचा राग घेऊन संदीप व सागर यांनी फरदीन मुजावर यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये फरदीन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच जखमी बाळू चौगुले यांनाही खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरोधात बुधवारी रात्री इस्पुर्ली पोलिसांमध्ये फिर्याद दिली.

मारामारीत गंभीर जखमी झालेला फरुदीन बाबासाहेब मुजावर याचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी संदीप बाळू चौगुले सागर बाळू चौगुले यांच्यावर इस्पुरली पोलिसात गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली

त्यावेळी वाद मिटला असता तर

काही महिन्यापूर्वी या दोन कुटुंबांमध्ये वाद झाला होता इस्पुर्ली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत दोन्ही कुटुंबाकडून तक्रारी झाली होती. मात्र राजकीय दबाव आणि पोलीस प्रशासनाकडून न निघालेला तोडगा यामुळे हा वाद मिटला नाही त्यामुळे हा वाद त्याच वेळी सामोपचाराने मिटला असता हा प्रसंग घडला नसता.. अशी चर्चा गावात सुरू होती.

Related Stories

जिल्हा बँकेसाठी अकरा मतदान केंद्रे

Patil_p

जवान विनय भोजे यांच्यावर तिळवणी येथे अंत्यसंस्कार

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : बामणीत शॉर्टसर्किटमुळे प्रापंचिक साहित्य जळून खाक

Archana Banage

सांगली : संख अप्पर तहसील कार्यालय असून अडचण नसून खोळंबा

Archana Banage

दुसऱया कोरोनामुक्तासाठी प्रार्थना

Patil_p

कोल्हापूर : अज्ञातांकडून ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकास बेदम मारहाण

Archana Banage