Tarun Bharat

नंदिहळ्ळीत दत्त मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प

वार्ताहर /धामणे

नंदिहळ्ळी येथे दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प व यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शनिवार दि. 18 रोजी करण्यात आले होते.

येथील कुरबरहट्टी येथे दत्त मंदिर बांधण्याचा संकल्प गावकऱयांच्यावतीने करण्यात आला असून दत्त जयंतीनिमित्त शनिवार दि. 18 रोजी मंदिरच्या नियोजित जागेवर भूमिपूजनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी सकाळी 7 वाजता भजन व प्रवचन, हरिपाठ हभप कल्लाप्पा जाधव आणि हभप ईश्वर राघोजी (चोपदार) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. दुपारी 2 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या दत्त मंदिरच्या जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष अशोक कामाणाचे, उपाध्यक्ष गणपती टोपगार, मदन पवार, शंकर टोपगार, तुकाराम टोपगार, नारायण पवार, चंद्रकांत बा. चोळकर, बाळाप्पा कुरबर, कृष्णा भातकांडे, लक्ष्मण गुंजीकर यांची कमिटी नेमली आहे. या कार्यक्रमप्रसंगी मारुती पवार यांनी या मंदिरसाठी 21 हजार रुपये, गणपती टोपगार 11 हजार रुपये, चंद्रकांत पाटील 10 हजार रुपये, शिवाजी टोपगार 5 हजार रुपये, चेतन पाटील 5 हजार रुपये व 50 पोती सिमेंट देणगीदाखल दिले आहे. 

Related Stories

आमदारांच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न

Patil_p

पावसाचा तडाखा, पिकांना फटका

Patil_p

तलावात पडलेल्या वृद्धेला वाचविले

Amit Kulkarni

संभाजी महाराजांना शिवसेनेतर्फे अभिवादन

Amit Kulkarni

किल्ला तलावात सोडणार 25 हजार मत्स्यबीज

Amit Kulkarni

कपिलेश्वर मंदिरच्या वतीने नवरात्री निमित्त विशेष अलंकार

Rohit Salunke