Tarun Bharat

नऊ महिन्यांनंतर वाजणार तिसरी घंटा

Advertisements

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेली जवळपास 9 महिने नाटय़गफह बंद होती त्यामुळे नाटय़वेडय़ा रसिकप्रेक्षकांना दर्जेदार नाटकांना मुकावं लागलं. पण आता प्रतीक्षा संपली आहे, महाराष्ट्रामध्ये कोरोना संकटाशी सामना करता करता पुनश्च हरिओम म्हणत पुन्हा अनेकांनी कामाला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारनेही मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात सिनेमागफह, नाटय़गफह उघडण्यास सशर्त मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा तिसरी घंटा कधी वाजणार याची प्रतिक्षा रसिक आणि नाटय़कर्मींना होतीच अखेर त्याची नांदी पुण्यात झी मराठी प्रस्तुत आणि प्रशांत दामले पॅन फौंडेशन निर्मित एका लग्नाची पुढची गोष्ट या धम्माल विनोदी नाटकाने होणार आहे. येत्या डिसेंबर 12 आणि 13 डिसेंबर पासून पुण्यातून या नाटकाचा पुन्हा शुभारंभ होतोय.

या प्रयोगाची तिकिटे बुक माय शोवर उपलब्ध आहेत. हे सांगतानाच झी मराठी वाहिनीचे व्यवसाय प्रमुख निलेश मयेकर म्हणाले, एका लग्नाची पुढची गोष्ट ह्या नाटकाने नाटय़सृष्टी अनलॉक होतेय ह्याचा खूप आनंद होतोय. यामुळे नाटय़कर्मी आणि एकूणच नाटय़ व्यवसायाला एक उभारी मिळेल, झी मराठी ची प्रस्तुती असलेल्या नाटकांची मेजवानी सुद्धा रसिकांना लवकरच अनुभवता येणार आहे. रसिकप्रेक्षकांनी सुद्धा नाटय़गफहात न घाबरता सुरक्षेची सगळी काळजी घेऊन येणार्या नाटकांचा आस्वाद घ्यावा.

Related Stories

रकुल प्रीत सिंहच्या ‘छतरीवाली’चे चित्रिकरण पूर्ण

Patil_p

रितेश-जेनेलियाच्या कंपनीवर भाजपचा गंभीर आरोप; अवघ्या 10 दिवसात भूखंड मंजूरी कशी?

Archana Banage

जेनिफर लोपेझ ‘जनरेशन अवॉर्ड’ने सन्मानित

Patil_p

एका चित्रपटासाठी उर्वशीने घेतले 10 कोटी

Patil_p

प्लॅनेट मराठी करणार सहा नव्या चित्रपटांची निर्मिती

Patil_p

अभिषेक-यामीच्या ‘दसवी’चा टीझर सादर

Patil_p
error: Content is protected !!